Join us  

हुबेहुब सैफ अली खान! इब्राहिमचा शर्टलेस अवतार बघून नेटकरी झाले इंप्रेस; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 2:10 PM

इब्राहिमचा जुहू स्पोर्ट्स ग्राऊंडवरील व्हिडिओ चर्चेत

सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंगचा (Amruta Singh) मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) सध्या त्याच्या लुक्समुळे चर्चेत असतो. इब्राहिम लोकप्रिय स्टारकिड आहे. पापाराझींसमोर तर तो नेहमीच मजामस्ती करताना दिसतो. इतर अनेक स्टारकिड्स कॅमेऱ्यासमोर नर्व्ह्स दिसतात. मात्र इब्राहिम नेहमीच आत्मविश्वासाने समोर येतो. बहीण सारा अली खानसोबत तर त्याची मस्ती नेहमीच चर्चेत असते. आता नुकताच इब्राहिमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जुहूमधील स्पोर्ट्स ग्राऊंडवरचा हा व्हिडिओ आहे. यात तो अगदी हुबेहुब सैफ अली खान दिसतोय.

इब्राहिमचा शर्टलेस अंदाज व्हिडिओत दिसून येतोय. एवढ्या कमी वयात सिक्स पॅक अॅब्स आणि फिट लुक पाहून तरुणी तर फिदाच झाल्या आहेत. त्यातच तो अगदी हुबेहुब वडील सैफ अली खानसारखा दिसतोय. 'सैफची झेरॉक्स कॉपी' अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे. फुटबॉल ग्राऊंडवरुन निघताना इब्राहिम सर्वांसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. सारा अली खानप्रमाणेच इब्राहिमही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल अशी चर्चा आहे.

नुकत्याच रिलीज झालेल्या करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात इब्राहिमने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले. तसंच सध्या तो श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. दोघंही अनेकदा डेटवर जाताना दिसत असतात.

टॅग्स :इब्राहिम अली खानसैफ अली खान बॉलिवूडमुंबई