Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळ्या या अभिनेत्रीनं चक्क उशीचा बनवला ड्रेस, फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 14:30 IST

ही अभिनेत्री मराठी बिग बॉस व हिंदी चित्रपटातही झळकली आहे.

 

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ माजवला आहे. तसेच देशभरातही कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढतो आहे. त्यामुळे देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व कलाकार घरातच आहेत आणि सोशल मीडियावर सक्रीय आहेत. कुणी व्हिडिओ टाकतंय तर कुणी फोटो. तसेच सोशल मीडियावर सध्या जुन्या फोटोंचा किंवा विविध गोष्टींचा ट्रेंड आणि चॅलेंज दिल्याचे देखील पहायला मिळत आहे. त्यात सध्या सोशल मीडियावर पिलो चॅलेंजदेखील पहायला मिळत आहे. त्यात अभिनेत्री सई लोकूर हिनेदेखील हे चॅलेंज स्वीकारत सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.

सई लोकूर हिने उशीचे कपडे बनवले असून त्याला निळ्या रंगाची रिबीन बांधली आहे तसेच निळ्या रंगाचा बो असलेला हेअर बॅण्डही तिने घातला आहे. या फोटोत ती खूप सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षावदेखील होतो आहे.

अभिनेत्री सई लोकुर ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात स्पर्धक होती. ती घरात शंभर दिवस राहून ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचली होती. या शोमधून ती घराघरात पोहचली. सईने तिच्या अभिनयातील कारकीर्दीची सुरूवात तिची आई वीणा लोकूर यांचे दिग्दर्शन असलेला चित्रपट मिशन चॅम्पियनमधून केली होती. या चित्रपटात तिच्यासोबत मोहन जोशी मुख्य भूमिकेत होते.

2015 साली तिने किस किसको प्यार करूँ या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन अब्बास मस्तान यांनी केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कपिल शर्मा, सिमरन कौर मुंडी व एली अवराम मुख्य भूमिकेत होते.

टॅग्स :सई लोकूरबिग बॉस मराठीकपिल शर्मा