Join us

सचिन पिळगावकरांच्या वडिलांना पाहिलंत का? वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 11:48 IST

सचिन पिळगावकरांच्या वडिलांना पाहिलंत का? वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने शेअर केला फोटो

सचिन पिळगावकर हे मराठी सिनेसृष्टीतील मोठं नाव आहे. बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेल्या सचिन यांनी मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीदेखील गाजवली. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करत अभिनयाचा ठसा उमटवून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारे सचिन पिळगावकर हे दिग्गज अभिनेते आहेत. त्यांचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. 

सोशल मीडियावरुन ते चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ते चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. सचिन यांच्या वडिलांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांनी वडिलांसोबतचा फोटो शेअर केला आहे. "हॅपी बर्थडे पापा" असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत.  सचिन पिळगावकर यांच्या वडिलांचं नाव शरद पिळगावकर असं होतं. शरद पिळगावकर हेदेखील सिनेसृष्टीत कार्यरत होते. ते एक निर्माते होते. 

दरम्यान, अभिनेता असण्याबरोबरच सचिन पिळगावकर एक दिग्दर्शक आणि निर्मातादेखील आहेत. त्यांनी अनेक सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. अलिकडेच त्यांचा नवरा माझा नवसाचा २ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमालाही प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. 

टॅग्स :सचिन पिळगांवकरमराठी अभिनेतासेलिब्रिटी