Join us
Daily Top 2Weekly Top 5

लूकवरुन ट्रोल करणाऱ्यांना रुपाली सणसणीत उत्तर देत म्हणाली, "माझ्या आईने रात्री २ पर्यंत जागून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 18:48 IST

'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसलेने तिच्या लूकवरुन ट्रोल करणाऱ्या माणसांना चांगलंच सुनावलं आहे

नुकतंच स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा झाला. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात 'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसलेने एक खास ज्वेलरी लूक परिधान केला होता. रुपालीच्या या ज्वेलरी लूकवर तिला बऱ्या वाईट प्रतिक्रियांचा सामना करावा लागला. रुपालीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत तिने लूकवरुन ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.

रुपालीने एक व्हिडीओ पोस्ट करुन लिहीलंय की, "खुप कौतुक आणि खुप वाईट प्रतिक्रिया सुद्धा आल्या ह्या लूकसाठी पण खरंच मला खुप आवडला कारण ह्याची ज्वेलरी माझ्या आईने बनवली होती माझ्यासाठी ते ही रात्री २ पर्यंत जागून. सो तिच्या नजरेने जेव्हा तिने पाहिलं तेव्हा तिला मी ह्या ज्वेलरीमध्ये सुंदर दिसेन आणि मी ते कॅरी करु शकेन असा आत्मविश्वास आला होता."

रुपाली पुढे लिहीते, "आणि खरंच मला ही ज्वेलरी घालून मला मी सुंदर सुद्धा दिसले आणि तेवढ्याच आत्मविश्वासाने मी हा लूक कॅरी केला होता. तर असा आहे माझा यावर्षीचा रेड कार्पेट लूक. थोडं लेटच पोस्ट करतेय कारण मला ह्या लूकबद्दलच्या प्रतिक्रिया बघायच्या होत्या. खुपच कमाल आणि जजमेंटल प्रतिक्रिया मिळाल्या. मज्जा आली पण म्हटलं अरेरे आपण पोस्टिंग करुया म्हणजे अजुन भन्नाट प्रतिक्रिया वाचायला मिळतील. सो हा व्हिडीओ तुमच्यासाठी." शेवटी रुपालीने आईचे या लूकबद्दल आभार मानले आहेत. अशाप्रकारे लूकवरुन ट्रोल करणाऱ्या आणि वाईट प्रतिक्रिया देणाऱ्यांना रुपालीने सणसणीत उत्तर दिलंय.

टॅग्स :रुपाली भोसलेआई कुठे काय करते मालिकामराठी