रुपाली भोसले (Rupali Bhosle)ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या रुपालीला 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील संजना हे खलनायिकेचं पात्र साकारून रुपाली प्रसिद्धीझोतात आली. मालिकेने प्रेक्षकांच्या निरोप घेतला असला तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नुकताच अभिनेत्री रुपाली भोसलेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
रुपाली उत्तम सुगरण आहे. तिनं उकडीचे मोदक बनवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. रुपालीच्या आईचा घरगुती जेवणाच्या ऑर्डरचा व्यवसाय असून नुकतच त्यांना १०० उकडीच्या मोदकांची ऑर्डर मिळाली होती. रुपालीनं आईला तिच्या नव्या व्यवसायात मदत करण्यासाठी हे मोदक बनवलेत. कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "गणपती बाप्पा मोरया... आम्ही सुरू केलं आणि करून दाखवलं... १०० उकडीच्या मोदकांची ऑर्डर पूर्ण केली". तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय.
रुपालीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती गेली अनेक वर्षे चित्रपटसृष्टीत काम करतेय. मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही तिनं काम केलंय. सुमित राघवन यांच्यासोबत 'बडी दूर से आये है' ही तिची मालिका प्रचंड गाजली होती. इंडस्ट्रीत कोणीही वारसा नसताना रुपालीने मेहनतीच्या जोरावर आपली ओळख निर्माण केली आहे. मुंबईत स्वतःच हक्काचं घर घेण्याचं स्वप्न तिने पूर्ण केलं इतकंच नव्हे तर काही दिवसांपूर्वीच रुपालीने नवी कोरी आलिशान कारही खरेदी केली. स्वतःच क्लाउड किचन किंवा रेस्टॉरंट असावं अशीही रुपालीची इच्छा आहे आणि ती लवकरच पूर्ण होईल यांत शंका नाही. आता चाहते तिच्या नव्या प्रोजेक्टची वाट पाहत आहेत.