Join us
Daily Top 2Weekly Top 5

RSS च्या कार्यक्रमात सलमान खानची हजेरी; 'भाईजान'च्या फॅशनवर मोहन भागवतांची टिप्पणी, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 19:26 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत एका भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सलमान खानने हजेरी लावली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईतील नेहरु सेंटर येथे भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजर होते. मात्र, या सगळ्यांमध्ये बॉलीवूड इंडस्ट्रीचा भाईजान म्हणजे सलमान खान आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. यावेळी कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सलमान खानचे उदाहरण देत, समाज एखाद्या गोष्टीचा स्वीकार कसा करतो, हे समजावून सांगितले. विशेष म्हणजे, ज्यावेळी भागवत हे विधान करत होते, तेव्हा खुद्द सलमान खान समोर बसून त्यांचे भाषण शांतपणे ऐकत होता.

आपल्या भाषणात मोहन भागवत म्हणाले की, समाजात फॅशन आणि ट्रेंड्स हे प्रभावातून निर्माण होतात. ते म्हणाले, "सलमान खान काय घालतो? महाविद्यालयीन विद्यार्थी तेच परिधान करतात. तो ते का घालतोय? हे कुणालाच माहीत नसतं, पण तो घालतो म्हणून ते लोकप्रिय होतं. मग ती गोष्ट चांगली असो वा वाईट, फॅशनमुळे ती पसरते".

पुढील स्पष्टीकरण देताना भागवत म्हणाले की, "जे लोक फॅशन किंवा ट्रेंड तयार करतात, त्यांना समाजात प्रभावशाली मानले जाते. अशा लोकांना आपल्या भाषेत 'महाजन' म्हणतात. समाज ज्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि ज्यांचा आदर करतो, अशा लोकांचे अनुकरण केले जाते" असेही त्यांनी नमूद केले.

सलमान खानसह दिग्गज मंडळींची उपस्थिती या कार्यक्रमात सलमानसोबतच ज्येष्ठ चित्रपट निर्माते सुभाष घई आणि प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांनीही या सत्राला उपस्थिती लावली होती. सलमान कार्यक्रमात पोहोचताच उपस्थितांनी त्याचे फोटो काढण्यासाठी एकच गर्दी केली होती. सध्या सोशल मीडियावर सलमान खान याचा कार्यक्रमातील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Salman Khan at RSS event; Mohan Bhagwat comments on fashion.

Web Summary : Salman Khan attended an RSS event where Mohan Bhagwat discussed fashion trends, citing Khan as an influencer. Bhagwat highlighted how celebrities impact society's choices, influencing trends, for better or worse. Filmmaker Subhash Ghai and lyricist Prasoon Joshi were also present.
टॅग्स :सलमान खानमोहन भागवत