Join us

रणवीर सिंगच्या 'सिम्बा'मधून रोहित शेट्टी करणार 'गोलमाल ५'ची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 08:00 IST

रणवीर सिंग आगामी चित्रपट 'सिम्बा'च्या प्रमोशनला लवकरच सुरूवात करणार आहे.

ठळक मुद्दे 'गोलमाल'च्या पाचव्या भागाची घोषणा केली जाणार 'सिम्बा' चित्रपटात

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या खूप चर्चेत आहेत कारण ते दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यासाठी ते दोघे इटलीला रवाना झाले आहेत. लग्नानंतर रणवीर सिंग आगामी चित्रपट 'सिम्बा'च्या प्रमोशनला सुरूवात करणार आहे. नुकतेच या चित्रपटातील एक गाणे चित्रीत करण्यात आले. ज्यात रोहित शेट्टीचे दिग्दर्शन असलेल्या चित्रपट गोलमालची स्टारकास्ट दिसणार आहे. या गाण्यातून गोलमालच्या आगामी भागाची घोषणा केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. 

नवभारत टाइम्सच्या रिपोर्टनुसार 'सिम्बा' चित्रपटातून गोलमालच्या पाचव्या भागाची घोषणा करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. ही माहिती अरशद वारसीने 'भैयाजी सुपरहिट'च्या प्रमोशनच्या मुलाखतीवेळी दिली. तो म्हणाला,' रोहित शेट्टी सध्या 'सिम्बा' चित्रपटात व्यग्र आहे. त्यामुळे 'गोलमाल ५'च्या तारखा आणि कथानकाबाबत निश्‍चित सांगता येत नाही. आम्ही काही दिवसांपूर्वीच हैदराबाद येथे सिम्बाचे एक गाणे शूट केले आहे. या गाण्यात आम्ही 'गोलमाल'वाला सिग्नेचर स्टाईल दाखवित 'गोलमाल 5'ची घोषणा करणार आहोत.' अरशद पुढे म्हणाला की, 'शूटिंगवेळी मी रोहितला विचारले की, गाण्यात आम्ही गोलमाल घेवून येत असल्याचे सांगू का तर त्याने होकार दर्शविला. 'रोहित शेट्टी व 'गोलमाल' टीमने त्यांच्या आगामी भागाबाबतची घोषणा दुसऱ्या चित्रपटातून करण्याची कल्पना फारच वेगळी आहे. त्यामुळे आता या गाण्याबाबतची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. दरम्यान, 'भैयाजी सुपरहिट'मध्ये अरशदशिवाय सनी दओल आणि प्रिती झिंटा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :सिम्बारणवीर सिंगअर्शद वारसी