Join us
Daily Top 2Weekly Top 5

कपूर घराण्यातील 'ही' अभिनेत्री होती रोहित शर्माची क्रश, म्हणाला, "ती माझी सर्वात आवडती...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 11:18 IST

लग्नाआधी रोहित शर्मा सुद्धा एका बॉलिवूड अभिनेत्रीवर फिदा होता.

सध्या देशात क्रिकेटमय वातावरण आहे. टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यापासून सगळेच खेळाडूंचं गुणगान गात आहेत. प्रत्येक खेळाडूने या वर्ल्ड कपमध्ये आपापलं योगदान दिलं. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल हे खेळाडू चमकले. काल टीम इंडियासह वर्ल्ड भारतात आला तेव्हा त्यांचं जंगी स्वागत झालं. मुंबईचा राजा रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वांना मरीन ड्राईव्ह आणि वानखेडेवर येण्याचं आवाहन केलं होतं. त्याप्रमाणे लाखो चाहते मरीन ड्राईव्ह परिसरात जमले होते. रोहित शर्माने सर्वांसोबत जल्लोष साजरा केला. 

कर्णधार रोहित शर्माची आवडती अभिनेत्री कोण माहितीये का?

क्रिकेट आणि बॉलिवूडचंही खास नातं आहे. अनेक खेळाडूंनी बॉलिवूड अभिनेत्रींसोबत लग्नगाठ बांधली आहे. तर काहींचं अफेअर चर्चेत राहिलं आहे. विराट-अनुष्का हे तर क्रिकेट-मनोरंजनजगातलं पॉवर कपल आहे. दुसरीकडे लग्नाआधी रोहित शर्मा सुद्धा एका बॉलिवूड अभिनेत्रीवर फिदा होता. ती अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडची 'बेबो' करीना कपूर(Kareena Kapoor).  २०१४ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला होता की, "मला करीना कपूर आवडते. ती खूपच सुंदर आहे. मी तिचे सगळे चित्रपट पाहतो. मी तिच्यावर फिदा आहे. ती माझी क्रश आहे."

दुसरीकडे करीना कपूर मात्र विराट कोहलीची चाहती आहे. एका मुलाखतीत तिने आवडता क्रिकेटपटू कोण? यावर किंग कोहलीचं नाव घेतलं होतं. तसंच त्याची खूप स्तुतीही केली होती. 

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मैत्रीचे अनेक क्षण चाहत्यांना अनुभवायला मिळाले. दोघांची गळाभेट असो किंवा एकत्र ट्रॉफी उचलतानाचा फोटो असो हे सर्वच चाहत्यांनी डोळ्यात साठवलं. वर्ल्ड कपल जिंकल्यानंतर दोघांनीही T20 मधून निवृत्तीची घोषणाही केली. 

टॅग्स :रोहित शर्माकरिना कपूरबॉलिवूड