Join us

रितेश देशमुखने हटके अंदाजात दिल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा; पाहा मजेशीर Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 15:45 IST

महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जिनिलिया यांनी सर्वांना दिवाळीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

आजपासून संपूर्ण देशभरात दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. दिवाळीचा सण दरवर्षी प्रकाशमय आणि उत्साहाचं वातावरण घेऊन येतो. प्रत्येकाच्या जीवनात आनंद, नवचैतन्य घेऊन येणारा हा सण आहे. हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दिवाळी मानला जातो.  महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जिनिलिया यांनीही सर्वांना दिवाळीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

रितेश देशमुखने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहलं, "आमच्या दिवाळीसारखीच तुमची दिवाळीदेखील हास्याने भरू दे. तुमच्या बायकोचे हसू माझ्या बायकोसारखेच आहे का? तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा". या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत रितेश आणि जिनिलियाचे भरभरुन कौतुक केलं आहे. 

रितेश देशमुख आणि पत्नी जिनिलिया यांची जोडी लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. रितेश आणि जिनिलिया सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. फोटो आणि व्हिडीओ शेअर करत रितेश आणि जिनिलिया चाहत्यांच्या संपर्कात राहतात. 'लयभारी' नंतर रितेश-जिनिलिया 'वेड' या सिनेमात एकत्र दिसले होते. त्यांचा हा चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरला. लवकरच रितेश देशमुख 'हाऊसफुल्ल-५' या हिंदी सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर जिनिलिया सितारे जमीन पर' मध्ये दिसणार आहे.

टॅग्स :रितेश देशमुखदिवाळी 2024जेनेलिया डिसूजा