Join us  

एकेकाळी अयाज खानने उचलला होता जेनेलियावर हात; तब्बल १३ वर्षांनी रितेशने घेतला बदला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 6:00 PM

Riteish deshmukh: Pappu Can't Dance या गाण्यावेळी अभिनेता अयाज खानने जेनेलियाच्या कानशिलात लगावली होती.

ठळक मुद्देअयाज खान हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार आहे.

महाराष्ट्राची लाडकी सूनबाई अर्थात अभिनेत्री जेनेलिया डिसुझा ( genelia d'souza) सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. जेनेलियाने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाच्या माध्यमातून तिने रितेशसोबत (riteish deshmukh) पहिल्यांदा स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर ती 'जाने तू या जाने' (jane tu ya jaane na)  ना या चित्रपटात झळकली. या चित्रपटातील Pappu Can't Dance हे गाणं तुफान लोकप्रिय झालं होतं. विशेष म्हणजे या गाण्यावेळी अभिनेता अयाज खानने (ayaz khan) जेनेलियाच्या कानशिलात लगावली होती. परंतु, तब्बल १३ वर्षांनंतर रितेशने या गोष्टीचा बदला घेतला आहे. रितेशनेदेखील अयाजच्या मुखकमलाच भडकावून दिली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'जाने तू या जाने ना' या चित्रपटात जेनेलियाने आदिती ही भूमिका साकारली होती. तर, अयाजने तिच्या होणाऱ्या नवऱ्याची भूमिका वठवली होती. या चित्रपटात  Pappu Can't Dance मध्ये आदिती डान्स करत असताना तिचा होणारा नवरा तिच्या कानशिलात लगावतो. विशेष म्हणजे या सीनचा बदला रितेशनेदेखील मजेशीर अंदाजात घेतला आहे. रितेशने सुद्धा अयाजला मारलं आहे. हा व्हिडीओ खुद्द अयाजने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

अयाजने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो आणि रितेश एकमेकांची मस्करी करताना दिसत आहेत. यात रितेश त्याला मारतोय. हा व्हिडीओ शेअर करत अयानने एक भारी कॅप्शन दिलं आहे. "..आणि अखेर दोघांमधील वाद मिटला",  असं कॅप्शन अयानने दिलं आहे.

रितेश देशमुखला पडला बिग बींचा विसर; kbc च्या मंचावर झाला जेनेलिया सोबत रोमँटिक

 दरम्यान, 'जाने तू या जाने ना' मध्ये झळकलेला अयाज खान हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार आहे. 'दिल मिल गये' या मालिकेच्या माध्यमातून तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. या मालिकेत त्याने डॉ. शुभांकर रॉय ही भूमिका साकारली होती. त्यानंतर तो 'ब्लफमास्टर', 'हनीमून ट्रॅवल्स प्रायवेट लिमिटेड', 'चश्मे बद्दूर','कुलवधू', 'पर‍िचय', 'पुनर्व‍िवाह', 'लौट आओ तृष्णा', 'कैसी ये यार‍ियां', 'केसरी नंदन' या मालिकांमध्ये झळकला होता.  

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजाबॉलिवूडसिनेमा