Join us  

तेरी विजय हो! रितेश देशमुखची तमन्ना भाटियासाठी हटके पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 12:37 PM

रितेशने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तमन्नासोबतचा फोटो शेअर केला.

बॉलिवूडची 'बाहुबली' अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने गुरुवारी (२१ डिसेंबर) ३४वा वाढदिवस साजरा केला. या तिच्या खास दिवशी चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटी मित्रांनी तिला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. यात मराठमोळा रितेश देखमुखने तमन्नाच्या वाढदिवशी खास पोस्ट करत तिला हटके पद्धतीने शुभेच्छा दिल्या. त्याच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. 

रितेशने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तमन्नासोबतचा फोटो शेअर केला. या फोटोला त्याने हॅपी बर्थडे हे गाणेही सेट केले होते. मात्र, यात विशेष गोष्ट होती, ती म्हणजे रितेशने फोटोला दिलेलं कॅप्शन. त्याने लिहले, 'वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा तमन्ना... तुझी सर्व स्वप्न पुर्ण होवोत. तेरी विजय हो!!'. रितेशचे हे कॅप्शन अभिनेता विजय वर्माकडे इशारा करत असल्याचे नेटकऱ्याचे म्हणणे आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तमन्ना आणि विजय एकमेकांना डेट करत आहेत. 

रितेश आणि तमन्ना हे चांगले मित्र आहेत. दोघांचा गेल्यावर्षी 'प्लान ए प्लान बी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.  त्याचा हा कॉमेडी ड्रामा नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. तमन्ना केवळ तामिळ सिनेमातच नाही तर तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषेतील सिनेमांमध्येही झळकली आहे. आज तिची गणना सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते. ती सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.  

टॅग्स :रितेश देशमुखतमन्ना भाटियाबॉलिवूडसेलिब्रिटी