Join us
Daily Top 2Weekly Top 5

Genelia Deshmukh : लग्नात ढसाढसा रडली होती जिनिलिया, ‘तो’ व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 16:40 IST

Riteish Deshmukh Genelia Deshmukh : रितेश देशमुख व जिनिलिया देशमुख या जोडप्याच्या लग्नाला नुकतीच ११ वर्ष पूर्ण झालीत. आता या जोडप्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय...

Riteish Deshmukh Genelia Deshmukh : रितेश देशमुख व जिनिलिया देशमुख गेल्या काही दिवसांपासून 'वेड' या सिनेमामुळे चर्चेत आहेत. रितेश व जिनिलियाचा 'वेड' हा मराठी सिनेमा तुफान गाजला. या चित्रपटातील रितेश-जिनिलियाची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली. रितेश व जिनिलिया हे चित्रपटगृष्टीतील लोकप्रिय जोडपं. या जोडप्याची ऑफ स्क्रीन केमिस्ट्रीही जबरदस्त आहे. नुकतीच या जोडप्याच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण झालीत. आता या जोडप्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडिओ आहे, रितेश व जिनिलिच्या लग्नातला. रितेश व जिनिलियाच्या लग्नाचे फोटो रोनिका कंधारी हिने काढले होते. गतवर्षी रोनिका यांनी रितेश व जिनिलियाच्या लग्नाच्या वाढदिवशी एक व्हिडीओ शेअर केला होता. सध्या हाच जुना व्हिडीओ व्हायरल होतोय.

व्हिडीओत जिनिलियाच्या लग्नातील काही खास क्षण दिसतात.  हा व्हिडीओ जिनिलियाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर रिपोस्ट करत या सुंदर व्हिडीओसाठी फोटोग्राफर रोनिकाचे आभार मानले आहेत.या व्हिडीओमध्ये जिनिलिया मराठमोळ्या लूकमध्ये दिसतेय.या व्हिडीओच्या शेवटी जिनिलिया रडताना दिसते. हा रडतानाचा फोटो जिनिलियाच्या विदाईचा आहे.  लग्नानंतर माहेर सोडून सासरी जाताना प्रत्येक मुलगी हळवी होते. जिनिलियाही याला अपवाद नाही. विदाईवेळी जिनिलिया ढसाढसा रडली होती.  

रितेश आणि जिनिलियाची प्रेमकहाणी कोणत्याही पटकथेपेक्षा कमी नाही. २००३ मध्ये 'तुझे मेरी कसम' चित्रपटाच्या सेटवर दोघेही पहिल्यांदा भेटले होते. रितेशचा हा डेब्यू चित्रपट होता, तर जिनिलिया आधीच दाक्षिणात्य सिनेमांमध्ये नावाजलेली अभिनेत्री होती. जिनिलिया रितेशला पहिल्यांदा भेटली तेव्हा तो मुख्यमंत्र्यांचा वाया गेलेल्या मुलासारखा असावा, असं तिला वाटलं होतं. पण हळूहळू ती रितेशमध्ये गुंतत गेली. रितेश आणि जिनिलिया यांनी १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केलं.  २०१२ मध्ये दोघांचं लग्न झालं. दोघांना रायल आणि रियान ही दोन मुलं आहेत.

टॅग्स :जेनेलिया डिसूजारितेश देशमुख