Join us

मुख्यमंत्र्यांच्या मुलानं बॉलिवूडमध्ये कमवलं नाव, फोटोत भावांसोबत दिसणारा चिमुकला कोण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 19:48 IST

बॉलिवूडमध्ये असा एक अभिनेता आहे, ज्याने राजकीय पार्श्वभूमी असताना नेता होण्याऐवजी अभिनेता होण्याचा निर्णय घेतला.

बॉलिवूडमध्ये असा एक अभिनेता आहे, ज्याने राजकीय पार्श्वभूमी असताना नेता होण्याऐवजी अभिनेता होण्याचा निर्णय घेतला. मेहनतीच्या बळावर त्याने मोठी लोकप्रियता कमावली. आज त्या अभिनेत्याचा वाढदिवस आहे. या खास दिवशी त्याचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या फोटोनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोमध्ये तिन चिमुरडे दिसत आहेत. पण हे कोण आहेत? हे तुम्हीच ओळखा.

फोटोत दिसत असलेले हे तिन्ही चिमुकले एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत. यांना तुम्ही अजूनही ओळखलं नसेल तर तुमच्यासाठी आणखी एक हिंट. फोटोतील ही चिमुकले महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्र्यांची मुले आहेत. तर ही गोंडस मुले दुसरे-तिसरे कोणी नसून महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची मुले आहेत. यातील  लाल टी-शर्टमध्ये दिसणारा हा मुलगा रितेश देशमुख आहे. तर इतर दोन हे धीरज विलासराव देशमुख आणि अमित देशमुख आहेत.

रितेश देशमुखचा आज 45 वा वाढदिवस आहे. त्याचा जन्म 17 डिसेंबर 1978 रोजी झाला होता. त्याचा जन्म एका राजकारणी घरात झाला होता. पण त्याने वडिलांचा वारसा पुढं चालवण्याऐवजी त्याने अभिनयाचा मार्ग निवडला आणि स्वत:च्या जोरावर स्थान निर्माण केलं. तुझे मेरी कसम या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या रितेशने आतापर्यंत 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. 

टॅग्स :रितेश देशमुखबॉलिवूडसेलिब्रिटीमराठी