Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऋषी कपूर यांची बिग बींबद्दल तक्रार!

By admin | Updated: January 21, 2017 03:11 IST

जोहरच्या ‘अ‍ॅन अनसुटेबल बॉय’मधील अनेक धक्कादायक खुलाशांनंतर आता ऋषी कपूर यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या आत्मकथनातून नवनवीन गुपीत बाहेर पडत आहेत.

करण जोहरच्या ‘अ‍ॅन अनसुटेबल बॉय’मधील अनेक धक्कादायक खुलाशांनंतर आता ऋषी कपूर यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या आत्मकथनातून नवनवीन गुपीत बाहेर पडत आहेत. या पुस्तकात ऋषी कपूर यांनी अमिताभ बच्चन यांच्याविषयी एक खंत बोलून दाखवली आहे. बिग बी त्यांच्या सिनेमातील सहकलाकारांना योग्य श्रेय देत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. ते लिहितात की, ‘अमिताभ बच्चन हे सत्तरच्या दशकात खूप मोठे स्टार होते. त्याकाळात अ‍ॅक्शन चित्रपटांची चलती होती. त्यामुळे स्वभाविकपणे चित्रपटात अमिताभ यांना सर्वात चांगले डॉयलॉग, भूमिका मिळायची. सिनेमात इतर कलाकारांना मात्र त्यांच्या तुलनते कमजोर भूमिका दिल्या जायच्या. त्यामुळे संपूर्ण चित्रपटाचे श्रेय ते घेऊन जात. ते सर्वात मोठे स्टार आहेत याविषयी माझे काहीच दुमत नाही. आमच्या कोणाकडेच त्यांच्यासारखे एवढे मोठे स्टारडम नव्हते. परंतु याचा अर्थ होत नाही की, आम्ही कमी दर्जाचे अभिनेते होतो. आम्हाला जाणूनबुजून कमी व हलक्या भूमिका दिल्या जायच्या.