मेलबर्न येथे येत्या ११ आॅगस्ट ते २० आॅगस्टदरम्यान रंगणाऱ्या ‘इंडियन फिल्म फेस्टिवल आॅफ मेलबर्न’मध्ये ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हे मुख्य अतिथी राहणार आहेत. याचदरम्यान होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात ऋषी कपूर यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. महिला सक्षमीकरणही यंदाच्या महोत्सवाची थीम आहे. इंडियन फिल्म फेस्टिवल आॅफ मेलबर्नची अॅम्बेसिडर विद्या बालन हिची महोत्सवातील उपस्थिती म्हणूनच अधिक लक्षवेधी ठरणार आहे. एकंदर दहा दिवसांच्या या महोत्सवात वेगवेगळ्या रंगारंग कार्यक्रमांची उधळण होणार आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}