Join us  

'या' कॉमेडियनपुढे कपिल शर्मा, जॉनी लिव्हर होतात फेल; एका सिनेमासाठी घेतो 2 कोटी, जाणून घ्या नेटवर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 8:31 AM

South star: तुम्ही ओळखलं का या अभिनेत्याला? दिग्दर्शक म्हणून सुद्धा आहे दुसरी ओळख

इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी लहानसहान भूमिका साकारून त्यांच्या करिअरची सुरुवात केली. मात्र, या भूमिकांच्याच माध्यमातून आज ते लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखले जातात. यात सध्या अशाच एका कॉमेडियनची चर्चा रंगली आहे. साऊथमध्ये या कॉमेडियनने त्याचा दबदबा निर्माण केला आहे. इतकंच नाही तर ११०० सिनेमा केलेला हा अभिनेता कमाईच्या बाबतीत कपिल शर्मा, जॉनी लिव्हर यांसारख्या प्रसिद्ध कॉमेडियनलादेखील मागे टाकतो. त्यामुळे या अभिनेता, कॉमेडियनविषयी जाणून घेऊयात.

साऊथमध्ये आपला दबदबा निर्माण करणारा अभिनेता, विनोदवीर म्हणजे ब्रह्मानंदम. साऊथमधील अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे.  इतकंच नाही तर त्यांनी १ हजारपेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. विशेष म्हणजे एकाच भाषेत ७०० पेक्षा जास्त सिनेमा केल्यामुळे त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये नोंदवण्यात आलं आहे.

ब्रह्मानंदम यांना २००९ मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांचा जन्म आंध्रप्रदेशमधील साटेनापल्ली या जिल्ह्यातील मुपल्ला गावात झाला. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना बराच स्ट्रगल करावा लागला. मात्र, आज ते कोट्यवधींचे मालक आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, २०२३ मध्ये ब्रह्मानंदम यांचं नेटवर्थ जवळपास ६० मिलियन यूएस डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार ५०० कोटी रुपये इतकं आहे. साऊथ इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून ब्रह्मानंदम यांच्याकडे पाहिलं जातं. ते एका सिनेमासाठी २ ते ३ कोटी रुपये मानधन घेतात. विनोदवीर, अभिनेता असण्यासोबतच ते दिग्दर्शकदेखील आहेत. ते एका जाहिरातीसाठी १.५ कोटी रुपये फी घेतात. त्यामुळे त्यांचं वार्षिक उत्पन्न २४ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटीकपिल शर्मा जॉनी लिव्हर