Join us
Daily Top 2Weekly Top 5

युविकाचा रेट्रो लूक

By admin | Updated: September 21, 2016 02:55 IST

काही वर्षांचा लीप घेतला. लीपनंतर शबाना आझमी, अश्मित पटेल यांसारख्या कलाकारांची या मालिकेत एंट्री झाली

‘एक माँ जो लाखों के लिये बनी अम्मा’ या मालिकेने नुकताच काही वर्षांचा लीप घेतला. लीपनंतर शबाना आझमी, अश्मित पटेल यांसारख्या कलाकारांची या मालिकेत एंट्री झाली. त्यांच्यासोबतच आता युविका चौधरीदेखील या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेचा काळ हा सत्तरीच्या दशकातील दाखवण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना एक वेगळी युविका या मालिकेत पाहायला मिळणार आहे. युविका या मालिकेत बॉबी या चित्रपटातील डिंम्पल कपाडियाची फॅन आहे असे दाखवण्यात आले आहे.