Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेमो डिसुझाला पडली मराठी गाण्याची भुरळ, 'गुलाबी साडी'वर बनवला झकास रील व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 17:10 IST

बॉलिवूडच्या गाण्यांवर ठेका धरणाऱ्या रेमोला आता मराठी गाण्याची भुरळ पडली आहे. रेमोने सध्या रीलवर ट्रेंडिंग असलेल्या 'गुलाबी साडी' या गाण्यावर रील व्हिडिओ बनवला आहे.

अफलातून डान्सने चाहत्यांना वेड लावणारा रेमो डिसुझा उत्कृष्ट डान्सर आहे. 'डान्स इंडिया डान्स' या शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत त्याने अनेक डान्सर घडवले. या शोने त्याला वेगळी ओळख दिली. त्याने अनेक बॉलिवूड गाण्यांचं कलादिग्दर्शन केलं आहे. रेमोचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 

ट्रेंडिंग गाण्यावरील रील व्हिडिओ रेमो शेअर करत असतो. बॉलिवूडच्या गाण्यांवर ठेका धरणाऱ्या रेमोला आता मराठी गाण्याची भुरळ पडली आहे. रेमोने सध्या रीलवर ट्रेंडिंग असलेल्या 'गुलाबी साडी' या गाण्यावर रील व्हिडिओ बनवला आहे. त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन रेमोने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो सुशांत खत्रीबरोबर गुलाबी साडी गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

रेमो सध्या 'डान्स प्लस प्रो' या रिएलिटी शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे. 'डान्स इंडिया डान्स'नंतर अनेक डान्स रिएलिटी शोचं त्याने परिक्षण केलं. त्याबरोबरच त्याने काही सिनेमांचं दिग्दर्शनही केलं आहे. 'एबीसीडी', 'एबीसीडी 2', 'अ फ्लाइंग जट' यांसारख्या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले आहे.

टॅग्स :रेमो डिसुझाटिव्ही कलाकार