Join us
Daily Top 2Weekly Top 5

या कारणासाठी संस्कृती बालगुडे गेलीय श्रीलंकेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 17:51 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री संस्कृती बालगु़डे श्रीलंकेला गेली आहे

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री संस्कृती बालगु़डे श्रीलंकेला गेली आहे. ती नेमकी कशासाठी तिथे गेली आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना...संस्कृती कुटुंबासोबत श्रीलंकेला व्हेकेशनसाठी गेली आहे. ही माहिती खुद्द तिने सोशल मीडियावर दिली आहे.

संस्कृती सोशल मीडियावर सक्रीय असते. ती तिचे स्टायलिश फोटो व अपडेट देत असते. नुकताच तिने आपले फोटो शेअर करीत लिहिले की, 'काही दिवस मी माझ्या कुटुंबासमवेत श्रीलंकेत व्यतित करणार आहे. तिथे जाण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. तिथून मी अपडेट देण्याचा प्रयत्न करेन जर वायफायची कृपा झाली तर. मला मिस करा. '

गेल्या महिन्यात संस्कृतीचा 'सर्व लाइन व्यस्त आहेत' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत होती.

या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या सिनेमात संस्कृती व्यतिरिक्त सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, महेश मांजरेकर, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी, राणी अग्रवाल, कमलाकर सातपुते, माधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर, हितेश संपत आणि गौरव मोरे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. 

टॅग्स :संस्कृती बालगुडे