साऊथची सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'पुष्पा' सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे. अल्लू अर्जुनसोबतचा हा सिनेमा रिलीज होताच सुपरहिट ठरला. वर्ल्डवाइड या सिनेमाला दमदार रिप्सॉन्स मिळत आहे. बॉक्स ऑफिसवरील कमाई रेकॉर्डही काही दिवसात मोडले जातील. अशात रश्मीका सिनेमा हिट होताच तिचा रूमर्ड बॉयफ्रेन्ड साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) ला भेटायला गेली होती.
विजय देवरकोंडा आणि रश्मीका मंदाना यांची जोडी फॅन्सच्या मनावर राज्य करते. दोघेही गोविंदम आणि डिअर कॉम्रेड सिनेमात एकत्र दिसले होते. त्यांची ऑनस्क्रीम केमिस्ट्री तर लोकांना आवडतेच, सोबतच त्यांची रिअल लाइफ केमिस्ट्रीही नेहमीच चर्चेचा विषय असते. गीता गोविंदम सिनेमानंतर दोघांमध्ये अफेअर असल्याची चर्चा सुरू झाली.
नुकतीच रश्मीका 'पुष्पा'च्या रिलीजनंतर एकदा पुन्हा गुपचूपपणे तिचा रूमर्ड बॉयफ्रेन्ड विजय देवरकोंडा याला रात्री उशीरा भेटायला गेली होती. तेव्हा त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. भेटीनंतर ते हॉटेलमधून बाहेर येतानाचे त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. दोघांनाही बाहेर येताना फोटोग्राफर्सनी कॅमेरा कैद केलं.
दोघेही स्टार रेस्टॉरन्टमधून बाहेर निघाले आणि एकाच कारमधून निघून गेले. या दोघांच्या अफेअरची जोरदार चर्चा असली तरी त्यांनी कधीही मीडियासमोर त्यांच्या अफेअरबाबत काहीही वक्तव्य केलं नाही किंवा तसं मान्य केलं नाही. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं ते सांगतात. तरी सुद्धा त्यांच्या लिंकअपच्या बातम्या समोर येत असतात.