Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग-बॉसनंतर इतकी बदलली रश्मी देसाई, Bold फोटो पाहून फॅन्सपण झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 13:36 IST

नेहमी तिचे क्युट फोटो शेअर करणाऱ्या रेश्मीने यावेळी सगळ्यांना क्लीनबोल्ड केले आहे.

लॉकडाऊनमुळे सध्या बॉलिवूड सेलिब्रेटींपासून टीव्ही सेलिब्रेटी शूटिंग बंद असल्यामुळे घरातच आहेत. याच काळात ते सोशल मीडियावर कमालीच सक्रिय झाले आहेत. बिग बॉस 13 ची कंटेस्टेंट टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाईसुद्धा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. रश्मी तिने शेअर केलेल्या हॉट फोटोमुळे चर्चेत आली आहे. नेहमी तिचे क्युट फोटो शेअर करणाऱ्या रेश्मीने यावेळी मात्र तिचा बोल्ड लूकमधील फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो बघून फॅन्सदेखील हैराण झाले आहेत. रश्मीच्या या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. या फोटोसोबत तिने  #BoldAndBeautiful असा हॅशटॅग दिला आहे. आतापर्यंत या फोटोला 2 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 

रश्मी देसाई आज छोट्या पडद्यावरचे मोठे नाव आहे. केवळ वयाच्या 16 व्या वर्षी ग्लॅमर इंडस्ट्रीत आलेल्या रश्मीने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेय.

'उतरन’ या मालिकेतील तिने साकारलेली तप्पूची भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे. हिंदी मालिकांसह रश्मीने भोजपुरी, असामी, गुजराती चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका साकारल्या आहेत. करिअर पिकवर असताना रश्मीने अभिनेता नंदीश संधूसोबत लग्नगाठ बांधली. ‘उतरण’ या मालिकेच्या सेटवर रश्मी व नंदीश जवळ आलेत आणि दोघांत प्रेम फुलले. पुढे दोघांचे लग्न झाले. लग्नाच्या चार वर्षांनंतर रश्मी व नंदीश विभक्त झालेत.

टॅग्स :रश्मी देसाई