‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वीपासूनच हा चित्रपट चर्चेत आहे. निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा हा आजवरचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटात बाजीरावची भूमिका निभावणा:या रणवीर सिंहने त्याची फी कमी केल्याची बातमी आहे. यामागे वेगवेगळी कारणो सांगण्यात येत होती; पण यामागचे खरे कारण आता समोर येत आहे. रणवीर या चित्रपटाच्या नफ्यातील काही भाग घेणार असल्याने त्याने त्याची फी कमी केली आहे. सध्या बॉलीवूडमध्ये अभिनेते फीऐवजी प्रॉफिट शेअर घेत असतात. यात फायदाही जास्त असतो. चित्रपटातील दोन्ही अभिनेत्री म्हणजेच दीपिका पदुकोण आणि प्रियंका चोप्रा मात्र फक्त अॅक्टिंग फी घेत आहेत.