Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणवीर सिंगने तैमूरच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 20:03 IST

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान व बेबो म्हणजेच करिना कपूर यांचा मुलगा तैमुरचे चाहते खूप आहेत.

ठळक मुद्देरणवीरला करायचे आहे तैमुरसोबत काम

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान व बेबो म्हणजेच करिना कपूर यांचा मुलगा तैमुर त्या दोघांपेक्षा जास्त लोकप्रिय आहे. त्याचे चाहते खूप असून त्यांना त्याच्याबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. तैमुरची लोकप्रियती एवढी प्रचंड आहे, की त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये चढाओढ लागलेली असते. तसेच प्रसारमाध्यमांमध्येदेखील तैमुरची प्रचंड क्रेझ आहे. मात्र, बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने तैमुरच्या बाबतीत एक इच्छा व्यक्त केली आहे.

दिग्दर्शक करण जोहरच्या चॅट शोमध्ये करणने रणवीरला प्रश्न विचारला होता, की 'तुला बॉलिवूडच्या कोणत्या 'खान' बरोबर काम करायला आवडेल'. यावर उत्तर देताना रणवीरने लगेचच तैमुरचे नाव घेतले. तो म्हणाला, की 'तैमुर मोठा झाल्यावर जेव्हा अभिनेता बनेल, तेव्हा मला त्याच्यासोबत चित्रपटात काम करायचे आहे. त्याच्या वडिलांची भूमिका साकारायला मला आवडेल. जेणे करून मी म्हातारा झाल्यावर तो माझ्या म्हातारपणाचा आधार बनेल', अशी रणवीरने इच्छा व्यक्त केली.तैमुरची लोकप्रियता अगदी त्याच्या जन्मापासून मोठ्या प्रमाणात असल्याचे पाहायला मिळते. त्याच्या नावापासून, तर त्याच्या निळ्या डोळ्यांपर्यंत आणि त्यात आणखी भर म्हणजे त्याचे गोड हास्य चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. त्याचमुळे तो मोठ्या प्रमाणात माध्यमात झळकत असतो. तैमुरला एवढ्या प्रचंड प्रमाणात दिली जाणारी प्रसिद्धीमुळे सैफ आणि करिनाने त्याला माध्यमांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :रणवीर सिंगतैमुर