Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या इतक्या महिन्यांनंतर रणवीर सिंग झाला भावूक! पत्नी दीपिका पादुकोणचे केले तोंडभरुन कौतुक!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 12:13 IST

होय, रणवीर सिंगने आपल्या पत्नीसाठी म्हणजे दीपिका पादुकोणसाठी हा खास मॅसेज लिहिलिा आहे.

ठळक मुद्दे. गतवर्षी १४ व १५ नोव्हेंबरला या दोघांनी इटलीत लग्नगाठ बांधली होती. कोंकणी आणि सिंधी पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला होता.

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणची जोडी रिल लाईफमध्येचं नाही तर रिअल लाईफमध्येही सगळ्यांची आवडती जोडी बनली आहे. लग्नानंतर या जोडीचे जितके काही फोटो व व्हिडिओ समोर आलेत, त्यातील दोघांची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. तुम्हाला आठवत असेल की, दीपिकाने आपल्या अलीकडच्या वाढदिवसाला एक वेबसाईट लॉन्च केली होती. या वेबसाईटवरचा एक इमोशनल मॅसेज वाचण्यासारखा आहे. होय, रणवीर सिंगने आपल्या पत्नीसाठी म्हणजे दीपिका पादुकोणसाठी हा खास मॅसेज लिहिलिा आहे.

तो लिहितो, ‘दीपिका एक अतिशय चांगली व्यक्ती आहे. ती माझी पत्नी आहे, म्हणून मी हे लिहित नाहीय. तिच्याबद्दल मला काय वाटते,हे व्यक्त करायला खरोखरचं माझ्याजवळ शब्द नाहीत. तरिही मी प्रयत्न करतो. या जगात मी तिच्या सर्वाधिक जवळ असणारा व्यक्ति आहे. पर्सनल आणि प्रोफेशनल अशा दोन्ही पातळीवर मी तिला ओळखतो. अस्सीम प्रेम, दया, बुद्धिमत्ता, सौंदर्य अशा सगळ्यांचा सुंदर समेट म्हणजे दीपिका. या सगळ्या गोष्टी तिला जगातील सर्वोत्तम अभिनेत्री बनवतात. तिची शिस्त आणि कामावरची निष्ठा याला तर तोडचं नाही. म्हणूनच कधी कधी मी थांबतो आणि या सुंदर आत्म्याची प्रशंसा करतो. मी जगातील सर्वाधिक नशिबवान पती आहे. तिने मला चांगला पुरूष बनण्यासाठी प्रेरित केले. माझे आयुष्य सफल केले. ती माझ्या आयुष्याचा प्रकाश आहे...,’असे रणवीरने लिहिले आहे.

दीपिका व रणवीर यांच्या लग्नाला जवळपास ३ महिने पूर्ण होत आहेत. गतवर्षी १४ व १५ नोव्हेंबरला या दोघांनी इटलीत लग्नगाठ बांधली होती. कोंकणी आणि सिंधी पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला होता.

टॅग्स :रणवीर सिंगदीपिका पादुकोण