Join us

लग्न, रिसेप्शन आटोपले; आता येणार रणवीर सिंगच्या ‘सिम्बा’चा ट्रेलर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 15:54 IST

काल १ डिसेंबरला तिसरे आणि शेवटचे रिसेप्शन झाले. आता मात्र रणवीरला कामावर परतावे लागणार आहे.

ठळक मुद्देकाल पहाटेपर्यंत रिसेप्शन पार्टी केल्यानंतर आज सकाळी रणवीरने ‘सिम्बा’ या त्याच्या आगामी चित्रपटाचे नवे पोस्टर जारी केले. शिवाय उद्या ३ नोव्हेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार असल्याचे जाहिर केले.

रणवीर सिंग गेल्या काही दिवसांपासून लग्नात व्यस्त होता. गत १४ व १५ नोव्हेंबरला रणवीर व दीपिका पादुकोणचे अगदी थाटामाटात लग्न झाले. या लग्नानंतर रिसेप्शनचा धडाका लागला. गत २१ नोव्हेंबरला दीपवीरने बेंगळुरु येथे लग्नाचे पहिले रिसेप्शन दिले. यानंतर २८ नोव्हेंबर त्यांच्या लग्नाचे दुसरे रिसेप्शन रंगले आणि काल १ डिसेंबरला तिसरे आणि शेवटचे रिसेप्शन झाले. आता मात्र रणवीरला कामावर परतावे लागणार आहे. होय, काल पहाटेपर्यंत रिसेप्शन पार्टी केल्यानंतर आज सकाळी रणवीरने ‘सिम्बा’ या त्याच्या आगामी चित्रपटाचे नवे पोस्टर जारी केले. शिवाय उद्या ३ नोव्हेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार असल्याचे जाहिर केले. त्यामुळे उद्या रणवीर ‘सिम्बा’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटला पोहोचेल. यावेळी सारा अली खान, रोहित शेट्टी असे सगळे हजर असतील.

रणवीरने लग्नाआधीच ‘सिम्बा’चे शूटींग संपवले होते. पण त्याच्या लग्नामुळे चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च इव्हेंट मात्र लांबणीवर पडला होता. रणवीरला अगदी मनासारखे लग्न एन्जॉय करता यावे म्हणून ट्रेलर लॉन्चसाठी ३ डिसेंबर ही तारीख निवडण्यात आली होती.‘सिम्बा’ हा रणवीरचा यंदा रिलीज होणारा दुसरा चित्रपट असेल. येत्या २८ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाआधी गत जानेवारी रणवीर व दीपिकाचा ‘पद्मावत’ रिलीज झाला होता.  'सिम्बा' सिनेमात रणवीर सिंग सोबत सैफ अली खानची मुलगी सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाची निर्मिती करण जोहर धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर अंतर्गत निर्मिती केली जात आहे.' सिम्बा' हा  चित्रपट साऊथच्या 'टेम्पर' या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. टेम्परमध्ये अभिनेत्रीचे काम फक्त प्रेमिकाच्या भूमिकेपर्यंत होते. मात्र 'सिम्बा'मध्ये सारा आणि रणवीरमध्ये एक सुंदर लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे.सिम्बा या सिनेमात रणवीरपहिल्यांदा पोलिस कर्मचा-याच्या भूमिकेत आहे. 

टॅग्स :रणवीर सिंग