मुंबईत सुरु असलेला ‘लॅक्मे फॅशन वीक 2019’ सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींमुळे गाजतो आहे. कृती खरबंदा पासून भूमी पेडणेकर, कंगना राणौत अशा अनेकींनी हजेरी लावून या शोला ‘चार चांद’ लावलेत. काल रात्री अनिल कपूर, रणवीर सिंग, जान्हवी कपूर अशा स्टार्सनी रॅम्पवर आग लावली. अनिल, रणवीर व जान्हवी यांनी डिझाईनर राघवेंद्र राठोर यांनी तयार केलेले कलेक्शनसाठी रॅम्पवॉक केला. पण हा रॅम्पवॉक यादगार ठरला तो रणवीर व अनिल यांच्यामुळे. होय, दोघांनीही रॅम्पवर असा काही ताल धरला की, सगळीकडेच उत्साह भरला. रॅम्पवॉक केल्यानंतर जान्हवी राघवेंद्रसोबत माघारी वळताच अनिल व रणवीर यांनी बॅकग्राऊंड म्युझिकवर ताल धरला. त्यांना रॅम्पवर असे नाचताना पाहून जान्हवीलाही आपले हसू रोखता आले नाही.
Lakme Fasion Week 2019! ...अन् अनिल कपूर व रणवीर सिंगने रॅम्पवर धरला ठेका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 14:03 IST
मुंबईत सुरु असलेला ‘लॅक्मे फॅशन वीक 2019’ सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींमुळे गाजतो आहे. कृती खरबंदा पासून भूमी पेडणेकर, कंगना राणौत अशा अनेकींनी हजेरी लावून या शोला ‘चार चांद’ लावलेत. काल रात्री अनिल कपूर, रणवीर सिंग, जान्हवी कपूर अशा स्टार्सनी रॅम्पवर आग लावली.
Lakme Fasion Week 2019! ...अन् अनिल कपूर व रणवीर सिंगने रॅम्पवर धरला ठेका!
ठळक मुद्देअनिल कपूर रॅम्पवर पोहोचताच रणवीरने त्यांना चीअरअप करणे सुरु केले.