Join us
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित आदित्य चोप्राच्या प्रेमात पडली राणी मुखर्जी, लग्न करण्यासाठी निर्मात्याने पहिल्या पत्नीला दिला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 13:36 IST

आदित्यसोबत लग्न केल्यानंतर राणीवर प्रचंड टीका झाली. राणीने पायलचे  घर तोडले असेही तिच्यावर टीका झाली.मात्र राणीने कधीच यावर उत्तर दिले नाही.

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी आणि सक्षम अभिनेत्री म्हणून राणी मुखर्जीकडे पाहिलं जातं. आज राणी तिचा  ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. राणीने आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. राणीने 1996 मध्ये 'राजा की आयेगी बारात' या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर राणीने 'कुछ कुछ होता है', 'बंटी और बबली', 'कभी अलविदा ना कहना' आणि 'मर्दानी' सारखे हिट सिनेमे बॉलिवूडला दिले. राणीने तिचं वैयक्तिक आयुष्य नेहमी लाईमलाईटपासून दूर ठेवणं पसंत केलं.

राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा या दोघांचे नाते कसे जुळले हे कायम गुलदस्त्यातच राहिले. कधीच दोघांची लव्हस्टोरी जगासमोर येऊ दिली नाही. विशेष म्हणजे राणी मुखर्जी जेव्हा आदित्य चोप्राच्या आयुष्यात आली तेव्हा तो आधीच विवाहित होता.  राणी मुखर्जीने नेहा धुपियाच्या ‘बीएफएफ विथ वोग’ या चॅट शोमध्ये खुलासा केला होता की तिची आणि आदित्य चोप्रा यांची पहिली भेट ‘मुझसे दोस्ती करोगे’च्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्राच्या जवळीकीच्या चर्चांमुळे आदित्यचे पालक यश चोप्रा आणि पामेला चोप्रा अस्वस्थ झाले होते. त्याचं कारण म्हणजे आदित्य विवाहीत होता. आदित्य चोप्राचे पहिले लग्न २००० मध्ये पायल खन्ना हिच्यासोबत झाले आणि २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

 रानी मुखर्जीसह लग्न करण्यासाठी यश चोप्रा यांनी आदित्यला नकार दिला होता. यश चोप्रा यांना आदित्य चोप्राने पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय अजिबात पटला नव्हता. राणीसह लग्न करण्यासाठी घराच्यांच्या विरोधात आदित्य चोप्राने दुस-यांदा संसार थाटला.

आदित्यसोबत लग्न केल्यानंतर राणीवर प्रचंड टीका झाली. राणीने पायलचे  घर तोडले असेही तिच्यावर टीका झाली.मात्र राणीने कधीच यावर उत्तर दिले नाही.नेहमीच मौन राहणे तिने पसंत केले. या जोडप्याने 2014 मध्ये लग्न केले आणि आज त्यांना अदिरा नावाची एक सुंदर मुलगी आहे जी सुमारे 7 वर्षांची आहे. आदिराला नॉर्मल आयुष्य द्यायचं असून कायम लाईमलाईटपासून दूर ठेवायचं असल्याचे तिने सांगितले आहे. 

टॅग्स :राणी मुखर्जीआदित्य चोप्रा