Join us

'रंग माझा वेगळा' मालिकेतील दीपाच्या साडीतल्या नव्या लूकनं चाहत्यांना घातली भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 18:56 IST

Rang Maza Vegla: 'रंग माझा वेगळा' मालिका सध्या नव्या वळणावर आली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मधील नवनवीन ट्विस्टमुळे प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. सध्या ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेत दीपाने आपल्या साधेपणाने आणि प्रेमळ स्वभावाने रसिकांच्या मनात घर केले आहे. दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) हिने साकारली आहे. रेश्मा शिंदे सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तसेच रिल व्हिडीओ आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. दरम्यान, नुकताच रेश्माने साडीतला फोटो शेअर केला आहे. या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने इंस्टाग्रामवर साडीतला फोटो शेअर केला आहे आणि तिच्या या साडीतल्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या फोटोला खूप लाइक्स आणि कमेंट्स येत आहेत. रेश्मा शिंदेने या फोटोत ग्रीन रंगाची वेलवेटची साडी नेसली आहे आणि त्यावर लाल रंगाचा मोठा पफवाला ब्लाउज परिधान केला आहे. तसेच नाकात नथही घातली आहे. तिने हा गेटअप स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यासाठी केला होता. तिच्या या लूकची सर्वत्र चर्चा झाली.

रंग माझा वेगळा मालिका सध्या नव्या वळणावर आली आहे. मालिकेत नुकतेच दीपिकाला कळलं की ती अनाथ आहे. त्यामुळे ती घर सोडून जाते. ती दीपाच्या घरी जाते. तिथे दीपा तिची समजूत काढून सौंदर्याला फोनवर दीपिका इथे असल्याचे सांगण्यासाठी बाहेर जाते. मात्र दीपिका तिथून पळून जाते. आयशा दीपाने दीपिकाला पळवल्याचा आरोप करते आणि पोलीस तक्रार करते. दीपाला पोलीस अटक करतात. त्यानंतर दीपिकाला सगळेजण शोधत असतात. यादरम्यान कार्तिक दीपावर खूप आरोप करतो. अखेर दीपिका सापडते. ती पोलीस स्टेशनमध्ये येऊन दीपाची चूक नसल्याचे पोलिसांना सांगते. दीपा सुटते पण दीपिका ईनामदारांच्या घरी जाण्यास नकार देते. तिची समजून काढूनही ती तिथे जाण्यास नकार देते. आता ती दीपाच्या घरी राहणार आहे. आगामी भागात सौंदर्या दीपाला दीपिकाला तुझ्याकडे राहू दे आणि कार्तिकीला ईनामदारांच्या बंगल्यात राहण्यासाठी पाठव असे सांगते. जेणेकरून तिच्यात आणि कार्तिकमध्ये चांगले बॉण्डिंग होईल असे सांगते. त्यामुळे आता कार्तिकी ईनामदारांच्या घरी राहायला जाईल का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :रेश्मा शिंदे