Join us

ऋषी कपूर यांना भेटण्यासाठी हा अभिनेता झाला अमेरिकेला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 15:54 IST

आजवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी अमेरिकेला जाऊन ऋषी कपूर यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. ऋषी कपूर एक स्ट्राँग व्यक्ती असून ते आजाराशी खंबीरपणे सामना करत आहेत.

ठळक मुद्देऋषी कपूर यांचे भाऊ आणि अभिनेते रणधीर कपूर नुकतेच अमेरिकेला रवाना झाले आहेत. त्यांना नुकतेच मुंबई विमानतळावर पाहाण्यात आले. 

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर लवकरच मुंबईत परतणार असल्याच्या बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात येत होत्या पण ते या महिन्यात तरी मुंबईत परतणार नसल्याचे नुकतेच सांगण्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ऋषी कपूर अमेरिकेत उपचार घेत आहेत. त्यांना कर्करोग झाला असल्याचे बोलले जात होते. मात्र या वृत्ताचे त्यांची पत्नी नीतू कपूर यांनी खंडन केले होते. अद्याप त्यांच्या आजाराबद्दल काहीच समजू शकलेले नाही. आजवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी अमेरिकेला जाऊन ऋषी कपूर यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. ऋषी कपूर एक स्ट्राँग व्यक्ती असून ते आजाराशी खंबीरपणे सामना करत आहेत. ऋषी कपूर यांचे भाऊ आणि अभिनेते रणधीर कपूर नुकतेच अमेरिकेला रवाना झाले आहेत. त्यांना नुकतेच मुंबई विमानतळावर पाहाण्यात आले. 

रणधीर कपूर तीन आठवड्यांसाठी अमेरिकेला गेले असून तिथे ते ऋषी आणि नितू यांच्यासोबत राहाणार आहेत. ऋषी यांची बहीण रिमा जैनदेखील ऋषी यांना भेटायला काही दिवसांपूर्वी अमेरिकेला गेली होती. रिमा अमेरिकेतून भारतात परतल्या असल्याचे नितू यांनीच इन्टाग्रामद्वारे सांगितले होते. त्यांनी ऋषी कपूर, रिमा जैन आणि त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. 

ऋषी कपूर यांच्या एका मित्राने ते मार्चमध्ये भारतात परतणार असल्याचे मीडियाला काही दिवसांपूर्वी सांगितले होते. पण ऋषी यांच्याशी वृत्तवाहिन्यांनी संपर्क केल्यानंतर त्यांचा सध्या तरी परत येण्याचा काहीही बेत नसल्याचे त्यांनी सांगितले होते. ऋषी कपूर यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांवर ते चांगला प्रतिसाद देत आहेत. पण त्यांच्या ट्रीटमेंटला अजून काही वेळ लागणार असल्याचे म्हटले गेले होते. ऋषी भारतात परतणार कधी याची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. 

ऋषी कपूर यांनी अमेरिकेला जाण्यापूर्वी मुल्क या चित्रपटाचे चित्रीकरण केले होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत तापसी पन्नू मुख्य भूमिकेत असून हा चित्रपट प्रेक्षकांना ऑगस्ट २०१८ मध्ये पाहायला मिळणार आहे.

 

टॅग्स :ऋषी कपूररणधीर कपूर