र णबीर कपूर, अयान मुखर्जी आणि बॉलीवूडमधील काही व्यक्ती कतरिना कैफच्या वाढदिवसाची एक सरप्राइज पार्टी देण्याची योजना आखत आहेत. कतरिना भारतात कधीच तिचा वाढदिवस सेलीब्रेट करीत नाही. परंतु सध्या कतरिना कोणत्याही चित्रपटाची शूटिंग करीत नाही. तिचा वाढदिवस १५ जुलै रोजी असून, तिला खूश करण्यासाठी रणबीरजवळ एक चांगली संधी आहे. यानिमित्ताने तिला एक मोठी सरप्राइज पार्टी देण्याचा विचार तो करतोय. अयान मुखर्जीवर या पार्टीची जबाबदारी आहे. मागील वर्षी तिने तिचा वाढदिवस क्रोशिया येथे साजरा केला होता. तेव्हा ती इम्तियाज अलीच्या ‘तमाशा’ चित्रपटाची शूटिंग करीत होती. मात्र ती तिच्या जवळच्या मित्रांसोबत वाढदिवस साजरा करण्याचा विचार करतेय.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}