Join us

'रॉकस्टार'साठी रणबीर कपूर नाही तर सैफ अली खान होता पहिली पसंती, मग घडलं असं काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 18:01 IST

रणबीर कपूर आणि नरगिस फाखरी स्टारर रॉकस्टार हा सिनेमा 2011मध्ये रिलीज झाला होता.

रणबीर कपूर आणि नरगिस फाखरी स्टारर रॉकस्टार हा सिनेमा 2011मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमातील दोघांच्या अभिनयाचे कौतूक झाले होते. सिनेमांच्या गाण्यांही प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. मीडिया रिपोर्टनुसार रणबीर कपूरच्या आधी हा सिनेमा सैफ अली खानला ऑफर करण्यात आला होता. या गोष्टीचा खुलासा स्वत: सैफने नेहा धुपिया टॉक शोमध्ये केला आहे. 

इम्तियाज अलीच्या रॉकस्टार चित्रपटाविषयी बोलताना सैफ नेहा धुपियाच्या 'नो फिल्ट नेहा सीझन 5' च्या कार्यक्रमात म्हणाला, 'मला रॉकस्टारची ऑफर देण्यात आली होती. इम्तियाजला मला रॉकस्टार बनवायचं व्हायचं होतं, पण त्याऐवजी आम्ही 'लव्ह आजकाल' बनवलं.

सध्या सैफ अली खान त्याच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आहे. सैफ अली खान आणि करिना कपूर दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. वर्कफ्रंटबाबात बोलायचे झाले तर सैफ अली खान काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या सुशांत सिंग राजूपतच्या दिल बेचारा सिनेमामध्ये दिसला होता. यात त्याने एक लेखकाची भूमिका साकारली होती. सैफ लवकरच 'बंटी और बबली 2' मध्ये दिसणार आहे.  

टॅग्स :सैफ अली खान रणबीर कपूर