Join us

माधुरीच्या मराठी सिनेमातून हा स्टार बॉलिवूड अभिनेताही करणार मराठीत डेब्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2018 16:38 IST

आता तर मीडिया रिपोर्टनुसार, माधुरी सोबतच बॉलिवूडचा आणखी एक मोठा स्टार या सिनेमातून मराठीत पदार्पण करणार आहे.

मुंबई : बॉलिवूडची धकधक गर्ल माधरी दीक्षित मराठी सिनेमात पदार्पण करत असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे या सिनेमाची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. आता तर मीडिया रिपोर्टनुसार, माधुरी सोबतच बॉलिवूडचा आणखी एक मोठा स्टार या सिनेमातून मराठीत पदार्पण करणार आहे.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, माधुरी दीक्षितच्या बकेट लिस्ट सिनेमात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरही दिसणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर पाहुण्या कलाकाराची भूमिका करणार आहे. याआधी माधुरीने सुद्धा रणबीरच्या ये जवानी है दिवानी सिनेमात एका गाण्यात डान्स केला होता.  

या सिनेमाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्करने केलं आहे. तर या सिनेमाची निर्मिती करण जोहरने केली आहे. रणबीर कपूर हा माधुरीचा मोठा फॅंन आहे हे त्याने अनेकदा बोलून दाखवले आहे. त्यामुळे स्क्रिप्ट मिळताच त्याने या सिनेमासाठी होकार दिला होता. या सिनेमात माधुरीसोबतच रेणुका शहाणे सुद्धा दिसणार आहे. 

टॅग्स :माधुरी दिक्षितरणबीर कपूर