Join us

रणबीर कपूरने खरेदी केली नवी कोरी रेंज रोव्हर, आलिशान गाडीसाठी खर्च केले 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 17:38 IST

रणबीर कपूर महागड्या गाड्यांचा शौकीन आहे. नुकतंच त्याने नवी कोरी रेंज रोव्हर ही गाडी घरी आणली आहे.

रणबीर कपूर हा सध्याच्या आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्यांपैकी एक आहे. ‘सावंरिया’ चित्रपटातून पदार्पण केलेल्या रणबीरने ‘अजब प्रेम की गजब कहाणी’, ‘राजनीती’, ‘बर्फी’, ‘रॉकस्टार’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘ब्रह्मास्त्र’ अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. रणबीर ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचा मुलगा आहे. कपूर कुटुंबात जन्म घेतलेल्या रणबीरने अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. रणबीर महागड्या गाड्यांचाही शौकिन आहे. नुकतंच त्याने रेंज रोव्हर ही महागडी कार खरेदी केली आहे.

रणबीरने बुधवारी(१६ ऑगस्ट) नवीन रेंज रोव्हर कार खरेदी केली. या गाडीची किंमत तब्बल ४ कोटी इतकी आहे. विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन रणबीरच्या कारचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. रणबीरकडे लक्झरियस गाड्यांचं कलेक्शन आहे. रेंज रोव्हर आधी त्याच्याकडे ऑडी ए८एल, लँड रोव्हर रेंज रोव्हर वोग, लँड रोव्हर रेंज रोव्हर स्पोर्ट्स, मर्सिडीज बेंझ एएमजी जी-६३ या महागड्या गाड्या आहेत. आता त्याच्या कलेक्शनमध्ये त्याने घेतलेल्या रेंज रोव्हरची भर पडली आहे.

‘व्हॉट झुमका’ गाण्याच्या संगीतकारांना आशा भोसलेंनी सुनावलं, म्हणाल्या, “जुन्या गाण्यांचे रिमेक...”

“पावनखिंड, फर्जंद पाहून गुन्हेगार सुधारले”, दिग्पाल लांजेकरांनी सांगितला अनुभव, म्हणाले, “ठाण्याच्या कारागृहात...”

दरम्यान, रणबीर 'एनिमल' या त्याच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणबीरने बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टबरोबर एप्रिल २०२२मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर काही महिन्यांतच रणबीर-आलिया आईबाब झाले. त्यांना राहा ही मुलगी आहे.

 

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भट