Join us  

बाबो! दीपिका-कतरिनाने रणबीर-आलियाला दिलं लाखोंचं वेडिंग गिफ्ट, सिद्धार्थ मल्होत्राही मागे नाही!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 11:28 AM

Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding : आलिया भटची आई सोनी राजदानने जावयाला 2 कोटी 50 लाखाचं घड्याळ गिफ्ट दिल्याचं कळतंय. या यादीत रणबीर व आलियाच्या ‘एक्स’चाही समावेश आहे.

 Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding : रणबीर कपूर ( Ranbir Kapoor ) व आलिया भट ( Alia Bhatt ) यांनी 14 एप्रिलला मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. रणबीर व आलियावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय. लग्नात आलिया व रणबीरला मिळालेल्या भेटवस्तूंचीही चर्चा होतेय.

आलिया भटची आई सोनी राजदानने आपल्या जावयाला 2 कोटी 50 लाखाचं घड्याळ गिफ्ट दिल्याचं कळतंय. लग्नातील सेलिब्रिटींनीही या कपलला एकापेक्षा एक महागड्या भेटवस्तू दिल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या यादीत रणबीर व आलियाच्या ‘एक्स’चाही समावेश आहे.

होय, आलियाचा एक्स बॉयफ्रेन्ड सिद्धार्थ मल्होत्राने आलियाला एक हँडबॅग गिफ्ट म्हणून दिली. याची किंमत 3 लाखाच्या घरात असल्याचं समजतंय.

रणबीरची कधीकाळीची गर्लफ्रेन्ड दीपिका पादुकोण हिने आलिया व रणबीर दोघांनाही घड्याळ गिफ्ट दिलं आहे. या दोन्ही घड्याळांची किंमत सुमारे 15 लाखांच्या घरात आहे.

कतरिना कैफ हिने आलियाला एक प्लॅटिनम ब्रेसलेट गिफ्ट केल्याची चर्चा आहे. याची किंमत कथितरित्या 14.50 लाख रूपये आहे.

रणबीरचं नाव प्रियंका चोप्राशीही जोडलं गेलं होतं. खरं काय, ते कळायला मार्ग नाही. पण प्रियंकाने न विसरता आलियाला लग्नाचं गिफ्ट पाठवलं आहे. तिने आलियाला 9 लाख रूपये किंमतीचा एक डायमंड नेकलेस गिफ्ट केल्याचं कळतंय.

वरूण धवन याने आलियाला गुच्चीची हाय हिल सँडल गिफ्ट केली आहे. याची किंमत 4 लाखाच्या घरात आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर 14 एप्रिल रोजी एका खाजगी समारंभात विवाहबंधनात अडकले. वांद्रे येथील त्यांच्या घरातील ‘वास्तू’मध्ये हा विवाहसोहळा पार पडला. या कार्यक्रमात करीना कपूर, सैफ अली खान, करिश्मा कपूर, करण जोहर आणि काही जवळच्या मित्रांसह दोन्ही कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.  

टॅग्स :रणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठरणधीर कपूरआलिया भटकतरिना कैफदीपिका पादुकोण