Join us

Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding: लग्नानंतर आलिया आणि रणबीर या मंदिरात जाऊन घेणार दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2022 18:39 IST

आलिया आणि रणबीर यांनी पंजाबी रितीरिवाजानुसार, लग्नगाठ बांधली आहे.

Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर-आलिया भट्ट विवाहबंधनात अडकले आहेत. आलिया आणि रणबीर यांनी पंजाबी रितीरिवाजानुसार, लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे आता आलिया यापुढे मिसेस कपूर या नावाने ओळखली जाणार आहे. रणबीर कपूरच्या पाली हिल येथील वास्तू अपार्टमेंटमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा झाला.

रणबीर आणि आलिया आजपासून त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार,नवविवाहित जोडपे रणबीर-आलिया यांना बाप्पाच्या आशीर्वादाने नवी सुरुवात करायची आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गणपतीच्या दर्शनासाठी जाणार असल्याची माहिती आहे.

रिपोर्टनुसार, रणबीर आणि आलियाच्या लग्नात संपूर्ण कुटुंब ऋषी कपूर यांची आठवण करून भावूक झाले होते. करिना कपूर, करिश्मा कपूर, पूजा भट, आकाश अंबानीपासून अनेक सेलेब्स रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाला पोहोचले होते. भावाच्या लग्नात करीना कपूर सैफ अली खानसोबत रॉयल लूकमध्ये दिसली. गुलाबी रंगात दोघेही अगदी वेगळ्या अंदाजात दिसले. याशिवाय रिद्धिमा कपूरही शाही अंदाजात दिसली.

रणबीर आणि आलियाच्या लग्नाचे आतापर्यंत एकही फोटो समोर आलेले नाहीत. लग्नानंतर रणबीर कपूर आणि आलिया भट संध्याकाळी ७ वाजता मीडियासमोर येणार आहेत. ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे.

टॅग्स :रणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठआलिया भटरणबीर कपूर