Join us

"अप्सरा आली..." गाण्याची साई पल्लवीला पडली भुरळ, मराठमोळ्या अंदाजात जबरदस्त डान्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 08:59 IST

दाक्षिणात्य कलाविश्वात साई पल्लवीच्या नावाचा दबदबा आहेत. त्यामुळे साईच्या आयुष्यात काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते कायम उत्सुक असतात.

Sai Pallavi : अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) ही कायमच चर्चेत असते. साई पल्लवी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. दाक्षिणात्य कलाविश्वात साई पल्लवीच्या नावाचा दबदबा आहेत. त्यामुळे साईच्या आयुष्यात काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते कायम उत्सुक असतात. अशातच तिचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती चक्क मराठी गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळतेय. 

नुकतंच साई पल्लवीच्या घरात लग्न सोहळा पार पडला आहे.  साई पल्लवीची लहाण बहिण पूजाने विनीतशी लग्न केले. हे तामिळनाडूमध्ये पारंपारिक पद्धतीने पार पडलं.  लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत. यातील साईच्या डान्स व्हिडीओनं सर्वांच लक्ष वेधलं. या लग्न सोहळ्यात साई पल्लवीचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळाला. तिने बहिणीच्या लग्नसोहळ्यात 'नटरंग' चित्रपटातील मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या  "अप्सरा आली..." या गाण्यावर दिलखेचक डान्स केला आहे.

साई पल्लवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर  ती लवकरच बहुप्रतीक्षित 'रामायण' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात साई ही सीतेची भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे साई ही पहिल्यांदाच रणबीर कपूरबरोबर काम करणार आहे. साई पल्लवीने आतापर्यंत 'फिदा', 'प्रेमम', 'लव्हस्टोरी', 'काली', 'मारी २' असे एकापेक्षा एक सुपरहीट सिनेमे दिले आहेत.  

टॅग्स :साई पल्लवीसेलिब्रिटीमराठीसोनाली कुलकर्णी