Join us
Daily Top 2Weekly Top 5

'राम तेरी गंगा मैली' फेम अभिनेत्री मंदाकिनीचा इतक्या वर्षांनंतर धक्कादायक खुलासा, म्हणाली - 'कमी पैसे देऊन...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 14:15 IST

Mandakini : मंदाकिनीने नुकतेच सिनेइंडस्ट्रीत पुन्हा एकदा पुनरागमन केले आहे. यादरम्यान तिने दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासे केले आहेत.

१९८५ साली प्रदर्शित झालेल्या 'राम तेरी गंगा मैली' (Ram Teri Ganga Maili) या चित्रपटातून रातोरात अभिनेत्री मंदाकिनी (Mandakini) प्रसिद्ध झाली. राज कपूरच्या या चित्रपटात मंदाकिनीने अनेक बोल्ड सीन्स दिले, ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. या चित्रपटात मंदाकिनीने कधी पारदर्शक साडी नेसून धबधब्यात आंघोळ केली तर कधी पडद्यावर स्तनपान करून प्रेक्षकांना चकित केले. या काळात अशी दृश्ये चित्रपटांमध्ये क्वचितच पाहायला मिळतात, अशा परिस्थितीत मंदाकिनीच्या या दृश्यांनी सर्वांना विचार करायला भाग पाडले. त्याचवेळी, आता वर्षांनंतर मंदाकिनी पुन्हा कमबॅक करत आहे. दरम्यान, आता मंदाकिनीने धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितले की, त्या काळात अभिनेत्रींना फक्त गाणी आणि काही दृश्यांसाठी घेतले जायचे.

मंदाकिनीने नुकतेच पुन्हा एकदा पुनरागमन केले आहे. त्याचे 'माँ ओ मां' हे गाणे गेल्या महिन्यात रिलीज झाले आहे. तिचा मुलगा रबिल ठाकूर याने या गाण्यात पदार्पण केले. दुसरीकडे, मंदाकिनीने अलीकडेच पिंकविलाला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत मंदाकिनी म्हणाली, 'त्यावेळी चित्रपटांमध्ये अभिनेत्रींना फारशी मागणी नव्हती. चित्रपटांमध्ये अभिनेत्रींचा वापर केवळ रोमँटिक सीन आणि गाण्यांसाठी केला जात असे. जेव्हा आम्ही चित्रपटांमध्ये काम करायचो तेव्हा संपूर्ण चित्रपटासाठी आम्हाला फक्त १ ते १.५ लाख रुपये मिळायचे.

याच मुलाखतीत मंदाकिनी पुढे म्हणाली, 'जेव्हा माझी मुलं मोठी झाली, तेव्हा मी पुन्हा माझ्याबद्दल विचार करू लागले. माझ्या मनात एकच गोष्ट होती की आता मुलं मोठी झाली आहेत, मग मी अभिनयात परत येऊ शकेन. याआधीही मंदाकिनीने तिच्या मुलाखतीत करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत.

टॅग्स :मंदाकिनी