Join us

'राम तेरी गंगा मैली' फेम अभिनेत्री मंदाकिनीवर तिच्या वडिलांनीच झाडली होती गोळी?, यावर ती म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 07:00 IST

Actress Mandakini :अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीबद्दल आणि तिच्या आयुष्यातील अशा अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला ज्या कोणालाच माहित नाहीत. तसेच तिने वडिलांबद्दल काही खुलासेही केले.

कॉमेडियन कपिल शर्मा(Kapil Sharma)चा शो खूप प्रसिद्ध आहे. अनेक स्टार्स त्यांच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी आणि मुलाखतींसाठी त्यांच्या शोमध्ये येतात. यावेळी कपिलच्या शोमध्ये ८०च्या दशकातील तीन अभिनेत्री दिसणार आहेत. यात मंदाकिनी, वर्षा उसगावकर आणि संगीता बिजलानी शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. या शोमध्ये मंदाकिनी(Mandakini)ने तिच्या वडिलांबद्दलच्या अफवेबद्दल भाष्य केले. 

आता नुकताच 'द कपिल शर्मा शो'चा लेटेस्ट प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये या एपिसोडची झलक पाहायला मिळत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये पाहिल्याप्रमाणे, अभिनेत्री मंदाकिनी शोमध्ये खूप धमालमस्ती करताना दिसत आहे आणि कपिल देखील मंदाकिनीला त्याच्या कॉमिक टायमिंगने हसवण्याची एकही संधी सोडत नाही. या शोमध्ये अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीबद्दल आणि तिच्या आयुष्यातील अशा अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला ज्या कोणालाच माहित नाहीत. तिने वडिलांबद्दल काही खुलासेही केले.

अभिनेत्री मंदाकिनीबद्दल एक अफवा पसरली गेली होती की तिच्यावर तिच्या वडिलांनी गोळ्या झाडल्या आहेत. याचा खुलासा करताना अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा मी सेटवर पोहोचले, तेव्हा सर्वजण माझ्याकडे आले की मी ठीक आहे का, हे विचारत होते. ते सर्व माझ्याबद्दल इतके का चिंतेत होते हे मला कळले नाही आणि नंतर मला ही अफवा कळली.'

मंदाकिनीचा 'राम तेरी गंगा मैली' चित्रपट आणि त्याचे संगीत खूप हिट झाले होते. मंदाकिनीला तिच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर नामांकनही मिळाले. हा चित्रपट मंदाकिनी आणि तिच्या बोल्ड सीन्ससाठी ओळखला जातो.
टॅग्स :मंदाकिनीद कपिल शर्मा शो