Join us

राखी सावंत उर्फ फातिमा लग्नानंतर पहिल्यांदाच पोहचली दर्ग्यात, म्हणाली, 'माझ्या लग्नासाठी दुआ...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 16:36 IST

आदिल खानशी निकाह केल्यानंतर राखी कधी हिजाब तर कधी बुरख्यात दिसली.

ड्रामा क्वीन राखी सावंतने (Rakhi Sawant) आदिल खानशी निकाह केल्यानंतर ती कधी हिजाब तर कधी बुरख्यात दिसली. इतकंच नाही तर तिने आपलं नाव बदलून फातिमा केल्याचंही जाहीर केलं. आता राखी दर्ग्यात गेली आहे आणि तिथला तिचा व्हिडिओ समोर आला आहे.

दर्ग्याबाहेर राखी म्हणते, 'माझं आदिलसोबत नुकतंच लग्न झालं आहे. पहिल्यांदा मी दर्ग्यात आली आहे. मला चादर चढवायची आहे. माझी दुआ कबुल व्हावी म्हणून मी आले आहे.माझ्या आईची तब्येत सुधारावी आणि माझं लग्न सफळ व्हावं ही माझी दुआ आहे.'

तसंच तिने हातात एक टोपली घेतली आहे. ज्यामध्ये चादर आहे जी तिला चढवायची आहे. गरीब नवाजचा उरुस सुरु आहे आणि मी ही चादर पेश करत आहे असं ती म्हणते. माझी दुआ कबुल व्हावी अशी इच्छाही ती व्यक्त करते. यावेळी राखीने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे तर डोक्यावर पिवळ्या रंगाची ओढणी ओढली आहे.

राखीची आई मुंबईतील क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार घेत आहे. ती ब्रेन ट्युमर आजाराशी झुंद देत आहे. त्यातच राखीचा पती आदिलने लवकर निकाह झाला असल्याचं माध्यमांसमोर कबुल न केल्याने ती खूप दु:खी होती. मात्र आता ती आदिल सोबत खूश असल्याचं दिसत आहे. फक्त तिच्या आईची तब्येत लवक बरी व्हावी म्हणून ती सध्या प्रार्थना करताना दिसत आहे.

टॅग्स :राखी सावंतसोशल मीडिया