Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मंत्र्याचा मुलगा का पकडला जात नाही?', भारतीच्या ड्रग्स कनेक्शनवरून राखी सावंतचा प्रश्न...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 09:24 IST

नेहमी वादात राहणारी कन्ट्रोवर्सी क्वीन राखी सावंतने भारती आणि हर्षचं नाव ड्रग्स केसमध्ये येण्यावरून एक मोठं वक्तव्य केलं आहे.

भारती सिंह आणि हर्ष लिम्बचियाला ड्रग्स प्रकरणी अटक झाल्यावर त्यांच्याविषयी भरपूर चर्चा झाली. टीव्हीवरील फेमस कॉमेडी जोडीला एनसीबीने न्यायालयीन कोठडीत ठेवलं होतं. दोघांच्या घरी आणि ऑफिसमध्ये धाड टाकल्यावर एनसीबीला ८६ ग्रॅम गांजा सापडला होता. यानंतर भारती आणि हर्षने ड्रग्स घेतल्याचं मान्यही केलं होतं. अशात दोघांना अटक करून मुंबईच्या किला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. मात्र, त्यांना लगेच जामीन मिळाला.

नेहमी वादात राहणारी कन्ट्रोवर्सी क्वीन राखी सावंतने भारती आणि हर्षचं नाव ड्रग्स केसमध्ये येण्यावरून एक मोठं वक्तव्य केलं आहे. राखीने प्रश्न उपस्थित केला की, फक्त फिल्म इंडस्ट्रीतील लोकांचीच नावे ड्रग्स केसमध्ये का समोर येत आहेत. एखाद्या मंत्र्याच्या मुलाचं नाव का समोर येत नाही? भारती असंही म्हणाली की, तिला संशय आहे की, भारती आणि हर्षला फसवलं गेलं आहे. त्यांना गुन्हा मान्य का केला हेच समजत नाहीये.

राखीने सांगितले की, तिला विश्वास बसत नाहीये की, भारतीसोबत असं होऊ शकतं. कारण भारती भारतातील नंबर १ कॉमेडीअन आहे. राखी म्हणाली की भारती आणि हर्ष माझे जवळचे मित्र आहेत. तसेच राखीने एनसीबीच्या कामाचंही कौतुक केलं आहे. राखी म्हणाली की, एनसीबी एजन्सी फार चांगलं काम करत आहे. मला तर वाटतं एकाएकाला नार्को टेस्टसाठी पाठवलं पाहिजे. सर्वांचं रक्त चेक करायला पाहिजे. ज्याप्रकारे कोरोनाची टेस्ट लीगल झाली आहे तशीच लोकांची ड्रग टेस्ट झाली पाहिजे. सर्वांच्या रक्तातून ड्रग्स निघणारच निघणार.

दरम्यान, राखी सावंतच्या या वक्तव्याचा व्हिडीओ विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. अनेक सोशल मीडिया यूजर्स या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत. काही यूजर्सने राखी सावंत म्हणणं बरोबर असल्याचं म्हटलं. एका यूजरने लिहिलं की, बरोबर बोलली.  

टॅग्स :राखी सावंतभारती सिंगअमली पदार्थबॉलिवूड