Join us
Daily Top 2Weekly Top 5

राखी सावंत 'बुरखा' घालून पोहोचली मक्का-मदिनाला, चाहत्यांना म्हणाली- 'काॅल मी फातिमा...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 18:10 IST

राखीचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे.  या व्हिडीओमध्ये तिने बुरखा घातला असून ती मक्का-मदिना येथे पोहोचली आहे.

ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत सोशल मीडियावर सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. अलिकडेच राखीचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे.  या व्हिडीओमध्ये तिने बुरखा घातला असून ती मक्का-मदिना येथे पोहोचली आहे. राखी उमराह  करण्यासाठी तेथे गेल्याचं म्हटलं जात आहे. यावेळचे तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका चाहत्याने तिला पाहताच राखी असं म्हटलं. मात्र, मी राखी नाही, मला फातिमा म्हण असं तिने या चाहत्याला सांगितलं. राखीने तिच्या इन्स्टाग्रामवर आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात ती अल्लाह समोर प्रार्थना करताना दिसत आहे. 

दरम्यान, राखीचे हे व्हिडिओ पाहून काही नेटेकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. 'सौ चूहे खाकर बिल्ली चली हज', 'अगं राखी नाटक बंद कर',  अशा कमेंट्स युझर्सने केल्या आहेत. राखी सावंतने आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केल्यानंतर इस्लाम धर्म स्वीकारला होता. राखीने  मे 2022 मध्ये आदिलसोबत गुपचूप लग्न केले होते.

टॅग्स :बॉलिवूडराखी सावंत