Join us
Daily Top 2Weekly Top 5

Rakhi Sawant : Video - राखी सावंतच्या चेहऱ्यावर जखमा; फॅन्स म्हणतात, आदिल जेलमध्ये मग मारलं कोणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 15:46 IST

Rakhi Sawant : राखी सावंतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर जोरदार व्हायरल होत आहे.

अभिनेत्री राखी सावंतचा (Rakhi Sawant) एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये राखी व्हॅनिटी व्हॅनमधून खाली उतरताना दिसत आहे. यामध्ये तिच्या चेहऱ्यावर मारहाण केल्यावर झालेल्या जखमा पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमुळे फॅन्स हैराण झाले असून ते मजेशीर कमेंट करत आहेत. आदिल खान दुर्रानी जेलमध्ये आहे मग राखीला मारलं कोणी? असा प्रश्न त्यांना पडला आहे. तिच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. 

राखीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, एका सीनमध्ये मारामारी होणार आहे. यानंतर ती तिच्या मेकअपमनला सांगते, "मेकअप अशा प्रकारे करा की, माझ्यावर हल्ला झाला आहे." राखी सावंतचा नवा ड्रामा पाहून चाहते दंग झाले आहेत. यावर अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. राखी सावंतचा हा व्हिडीओ व्हायरल भयानीने इन्स्टाग्रामवर दोन तासांपूर्वी शेअर केला आहे, ज्याला सुमारे साडेसहा हजार लाईक्स मिळाले आहेत.

व्हिडीओ शेअर करताना "राखी सावंत - मला खूप मारलं आहे" असं कॅप्शन दिलं आहे. ड्रामा क्वीनच्या या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी यांच्यातील खटके दिवसेंदिवस वाढत आहेत. आदिलच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आणि पोलिसांत तक्रार देण्यासाठी राखी शर्लिन चोप्रासोबत म्हैसूरला पोहोचली होती. आता म्हैसूरला पोहोचल्यानंतर राखी सावंतने आदिलची एक्स गर्लफ्रेंड रोशिनाची देखील भेट घेतली. 

"आदिलच्या डोक्यावर केस नाहीत, तो बायसेक्शुअल, त्याचा न्यूड Video…"

राखीने सांगितले की, तिला आदिलचं सत्य कळलं की, "तो व्यवसायाने ड्रायव्हर आहे. बायसेक्शुअल आहे, डोक्यावर केस नाहीत. झोपडपट्टीत राहतो. आदिल खानच्या डोक्यावर केस नाहीत, हे मला माहीत नव्हतं. त्याला टक्कल आहे, याची माहिती मला हेअर अँड स्कीन फॅक्टरीने दिली आहे. हे ऐकून मला धक्का बसला आहे. तो बायसेक्शुअल आहे, हेही मला समजलं आहे. त्याचा एक न्यूड व्हिडीओही काहीच दिवसांपूर्वी मी पाहिला. खूप घाणेरडा व्हिडीओ होता" असं राखीने म्हटलं आहे. आदिल पोलिसांच्या ताब्यात आहे. ड्रामा क्वीनचा नवरा तुरुंगात आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :राखी सावंतबॉलिवूड