Join us

‘ड्रामेबाज’ राखी सावंतने असे दिले रणवीर सिंगच्या ‘आय लव्ह यू’चे उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 14:31 IST

अलीकडे रणवीर सिंग यानेही राखीची भरभरून स्तूती केली. राखी सावंत बॉलिवूडची खरी रॉकस्टार आहे. मला ती खूप आवडते, असे सांगून त्याने सगळ्यांना हैराण केले. केवळ इतकेच नाही तर राखीला ‘आय लव्ह यू’ सुद्धा म्हटले. आता राखी रणवीरच्या या ‘आय लव्ह यू’चे उत्तर देणार नाही, असे कसे होणार?

ठळक मुद्देअलीकडे राखी कुंभमेळ्यात संगम स्थान करताना दिसली होती.  ‘सोळा शृंगार’ करून कुंभमेळ्यात पोहोचून तिने सगळ्यांनाच धक्का दिला होता. 

सोशल मीडियाचा सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह राहणा-या सेलिब्रिटींची यादी करायची झाल्यास ड्रामा क्वीन राखी सावंत हिचे नाव सगळ्यात वर येईल. मुद्दा कुठलाही असो, राखी अगदी बेधडक बोलते. वाट्टेल ती मतं मांडून चर्चेत येते. दरवेळी तिच्या  या ‘ड्रामेबाजी’वर टीका होते. पण राखी कुणालाच जुमानत नाही. कदाचित म्हणूनच काही लोकांना तिचा ‘ड्रामा’ आवडतो. अलीकडे रणवीर सिंग यानेही राखीची भरभरून स्तूती केली. राखी सावंत बॉलिवूडची खरी रॉकस्टार आहे. मला ती खूप आवडते, असे सांगून त्याने सगळ्यांना हैराण केले. केवळ इतकेच नाही तर राखीला ‘आय लव्ह यू’ सुद्धा म्हटले. आता राखी रणवीरच्या या ‘आय लव्ह यू’चे उत्तर देणार नाही, असे कसे होणार? राखीने तिच्या खास अंदाजात रणवीरच्या ‘आय लव्ह यू’चे उत्तर दिले. तिचा हा अंदाज पाहून तुम्हीचं नाही तर रणवीरही हैराण होणार. होय, राखीने थेट रणवीर सिंगच्या नावाचा टॅटूचं गोंदवला. सोबत याचा व्हिडिओही शेअर केला.

तू मला रॉकस्टार म्हटलेस. माझ्याकडून तुला हे गिफ्ट..., असे राखी या व्हिडिओत म्हणतेय. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ शेअर करताना तिने रणवीर, आलिया भट्ट, दीपिका पादुकोणला टॅग केलेय. शिवाय रणवीरच्या ‘गली बॉय’चे प्रमोशनही केलेय. नेहमीप्रमाणे या व्हिडिओमुळेही राखी ट्रोल झाली. अनेक युजर्सनी तिच्यावर टीका केली. पण राखीवर या टीकेचा परिणाम होईल तर ना...अलीकडे राखी कुंभमेळ्यात संगम स्थान करताना दिसली होती.  ‘सोळा शृंगार’ करून कुंभमेळ्यात पोहोचून तिने सगळ्यांनाच धक्का दिला होता. 

 

टॅग्स :राखी सावंतरणवीर सिंग