Join us

राखी सावंतविरोधात बेस्टफ्रेंडची पोलिसांत तक्रार दाखल, नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 15:00 IST

राखी सावंतच्या आयुष्यात वादळ, बेस्टफ्रेंडनेच केली अभिनेत्रीविरोधात पोलीस तक्रार, जाणून घ्या कारण

आयटम साँगमधून प्रसिद्धी मिळवलेली ड्रामा क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. एक्स पती आदिल खानवर राखीने अनेक गंभीर आरोप केले होते. राखीच्या या कठीण काळात तिची मैत्रीण राजश्री तिच्याबरोबर होती. अनेक व्हिडिओंमध्येही राखी आणि राजश्री एकत्र दिसायच्या. आता राखीची बेस्टफ्रेंड असलेल्या राजश्रीनेच तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याबद्दल कळताच राखीला धक्का बसला आहे.

विरल भय्यानी या पापाराझी पेजनुसार, बुधवारी(२३ ऑगस्ट) राजश्रीने राखीविरोधात पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. “आदिल जेलमधून बाहेर आल्याच्या पहिल्या दिवसापासून राखी मला धमकावत आहे. अशा खूप गोष्टी आहेत ज्याचा मी खुलासा करू शकते”, असं राजश्रीने म्हटलं आहे. यावर राखीनेही प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या कठीण काळात ती नेहमीच्या माझ्याबरोबर खंबीर उभी होती. तिच्या कठीण प्रसंगात मीही तिला साथ दिली आहे. ती नेहमीच माझी बेस्टफ्रेंड राहील. माझ्या आयुष्यात हे काय घडतंय हे कळत नाहीये,” असं राखी म्हणाली.

शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटातील ७ गोष्टींवर सेन्सॉर बोर्डाची कात्री; राष्ट्रपतींचा उल्लेख असलेला ‘तो’ डायलॉग बदलणार

“सलमानच्या हिट अँड रन केसमुळे चित्रपट फ्लॉप ठरला”, ‘गदर २’ फेम अमीषा पटेलचं मोठं वक्तव्य

दरम्यान, राखीचा पती आदिल खान सहा महिन्यांनी तुरुंगातून बाहेर आला आहे. त्याने राखीवर ड्रग्ज देऊन न्यूड व्हिडिओ बनवल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबरोबर राखीचा घटस्फोट झाला नसल्याचंही त्याचं म्हणणं आहे. आदिलच्या या आरोपांना राखीने मंगळवारी(२२ ऑगस्ट) प्रेस कॉन्फरन्स घेत उत्तरं दिली. याबरोबरच राखीने पुन्हा आदिलवर गंभीर आरोप केले आहेत.

टॅग्स :राखी सावंतसेलिब्रिटीबिग बॉस