बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी एक काळ प्रचंड गाजवला. अशाच एक अभिनेत्री म्हणजे राखी गुलजार (Rakhee Gulzar). जवळजवळ ३० दशके चित्रपटसृष्टीवर राखी गुलजार यांनी राज्य केलं. एकापेक्षा एक हीट चित्रपट त्यांनी बॉलिवूडला दिलेत. मुख्य अभिनेत्री, तर कधी बहिणीच्या आणि नंतर आईच्या भूमिकेपर्यंतचा प्रवास त्यांनी केला. प्रत्येक भुमिकेतून राखी यांनी एक वेगळी छाप पाडली. एवढी वर्ष फिल्म इंडस्ट्रीवर राज्य केल्यानंतर त्या अचानक प्रसिद्धीपासून दूर गेल्या. पण, आता त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्या लवकरच फिल्मी जगतात कमबॅक करणार आहेत.
राखी गुलजार यांनी २००३ साली बॉलिवूडकडे पाठ फिरवली होती. त्या 'दिल का रिश्ता' मध्ये दिसल्या होत्या. तर मध्येच २००९ मध्ये आणि २०१९ मध्ये त्यांनी बंगाली चित्रपटांमध्ये काम केलं होतं. आता राखी पुन्हा एकदा पडद्यावर पुनरागमन करत आहे. लवकरच त्या नंदिता रॉय आणि शिबोप्रसाद मुखर्जी यांच्या आगामी बंगाली चित्रपट 'आमर बॉस'मध्ये पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट येत्या १६ मे रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. राखी गुलजार मुंबईजवळील पनवेल येथील तिच्या फार्म हाऊसवर एकट्या राहतात.
राखी यांनी वयाच्या २० व्या वर्षी बंगाली चित्रपटांमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर १९७० मध्ये 'जीवन मृत्यु' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर, राखी ७० च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये सुपरहिट नायिका होती. यानंतर राखी यांनी ८० आणि ९० च्या दशकातही अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. १०० हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. राखी यांचे पूर्व पती गुलजार यांनीही ऑस्कर जिंकलेला आहे. राखी गुलजार आणि गुलजार यांची मुलगी मेघना गुलजार ही देखील एक सुपरहिट बॉलिवूड दिग्दर्शिका आहे.