Join us  

राहुल द्रविड होता अनुष्काचं पहिलं प्रेम; अभिनेत्रीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2021 3:23 PM

Anushka shetty: दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तुफान नाव कमावणाऱ्या या अभिनेत्रीने तिचा क्रश असलेल्या क्रिकेटपटूचं नाव सांगितलं आहे.

क्रीडाविश्व आणि बॉलिवूड (bollywood) या दोन क्षेत्रांचा अगदी जवळचा संबंध आहे हे गेल्या काही वर्षांमध्ये प्रकर्षाने पाहायला मिळालं आहे. आज बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्री लोकप्रिय क्रिकेटपटूंच्या पत्नी असल्याचं पाहायला मिळतं. यात सागरिका घाटगे (Sagarika Ghatge) आणि अनुष्का शर्मा (anushka sharma) या दोन अभिनेत्रींचं नाव आवर्जुन घेतलं जातं. इतकंच नाही. तर, काही क्रिकेटपटूंचही बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींवर क्रश असल्याचं पाहायला मिळतं. परंतु, यावेळी एक दाक्षिणात्य अभिनेत्री चर्चेत आली आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तुफान नाव कमावणाऱ्या या अभिनेत्रीने तिचा क्रश असलेल्या क्रिकेटपटूचं नाव सांगितलं आहे.

'बाहुबली' या चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली देवसेना अर्थात अभिनेत्री अनुष्का शेट्टी (anushka shetty) हे नाव कोणासाठीही नवीन नाही. उत्तम अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण करणारी अनुष्का कायमच तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असते. यामध्येच सध्या तिची एक मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिने प्रसिद्ध क्रिकेटपटू राहुल द्रविड (rahul dravid) तिचं क्रश असल्याचं सांगितलं आहे. इतकंच नाही तर राहुलवर क्रश असूनही ती त्याला एकदाही न भेटल्याचं तिने म्हटलं आहे.

अनेकदा अनुष्काला तिच्या लाइफ पार्टनरविषयी प्रश्न विचारले जातात. त्यामुळे एका मुलाखतीत तिने तिच्या क्रशचं नाव सांगितलं. भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू राहुल द्रविड हा माझा आवडता क्रिकेटर आहे. फक्त क्रिकेटर नाही तर एक असा काळ होता ज्यावेळी मी त्याच्या प्रेमात पडले होते. तो माझा क्रश होता. परंतु, अजूनही आम्ही कधीच भेटलो नाही, असं ती म्हणाली.

दरम्यान, अनुष्का दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'सुपर' या चित्रपटाच्या माध्यमातून तिने करिअरची सुरुवात केली.  त्यानंतर असंख्य चित्रपटांमध्ये ती झळकली. परंतु, 'बाहुबली' या चित्रपटात तिने साकारलेली देवसेना ही भूमिका तुफान गाजली.  

टॅग्स :अनुष्का शेट्टीबॉलिवूडTollywoodराहुल द्रविड