Join us  

लग्नानंतर परिणीती चोप्राने सोडला अभिनय? राघव चढ्ढा यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 1:22 PM

परिणीती चोप्रा ही हिंदी चित्रपटांची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

परिणीती चोप्रा ( Parineeti Chopra ) ही हिंदी चित्रपटांची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती केवळ अभिनेत्री नाही तर ती एक उत्कृष्ट गायिका देखील आहे.  अनेक चित्रपटातील गाण्यांना तिनं आवाज दिला आहे. आप नेते राघव चढ्ढा यांच्याशी लग्न केल्यानंतर आता परिणीतीनं गायनाच्या मंचावर पदार्पण केलं आहे. आता तिनं स्वतःचे लाइव्ह शो सुरू केले आहेत. आपल्या लाडक्या बायकोला प्रोत्साहन देण्यासाठी राघव चढ्ढा ( Raghav Chadha ) यांनी खास पोस्ट केली आहे.

परिणीती चोप्रानं मुंबई फेस्ट 2024 मध्ये सिंगिंग डेब्यू केलं. लाइव्ह सिंगिंगच्या दुनियेत तिनं हे पहिले पाऊल ठेवलं आहे. यावेळी परिणीतीनं  ब्लॅक आऊटफिट आणि गोल्डन ज्वेलरी परिधान केलेली दिसून आली. ती या लुकमध्ये खूपच स्टायलिश दिसली. तिच्या या मोठ्या निर्णयाचं राघव यांनी कौतुक केलं. राघव यांनी परिणीतीचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं, 'माझी रॉकस्टार, माझी स्वतःची मेलडी क्वीन.... एका ट्रेंड क्लासिकल गायकासारखं तू गाते आहेस हे पाहून आनंद झाला. तु आता एका नव्या प्रवासाला निघाली आहे. ज्याची तु खूप दिवसांपासून वाट पाहत होतीस.  मी कायम तुझ्यासोबत असेन. आता जगाला तो कॉन्सर्ट पाहायला मिळेल, जो मला रोज फुकटात घरबसल्या पाहायला मिळतोय'. राघव यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव केला. 

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचं २०२३ मध्ये लग्न झालं. राजस्थानमधील उदयपूर येथील लीला पॅलेसमध्ये दोघांनी शाही पद्धतीने लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. दोघांच्या या जोडीला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. तर परिणीतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अक्षय कुमारसोबत 'मिशन रानीगंज: द ग्रेट इंडियन रेस्क्यू' या चित्रपटात दिसली होती. आता ती लवकरच 'अमर सिंह चमकीला'मध्ये  दिलजीत दोसांझसोबत दिसणार आहे. हा चित्रपट पंजाबमधील एका प्रसिद्ध गायकाच्या जीवनावर आधारित आहे.

टॅग्स :परिणीती चोप्रासेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा