Join us

पुष्पा नाव ऐकून गुलाबाचं फुल वाटलो काय...? ‘पुष्पा: द राइज’ हा मराठमोळा ट्रेलर एकदा बघाच!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 13:30 IST

Pushpa Trailer in Marathi : अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’चा हा मराठमोळा ट्रेलर पाहून तुम्हीही म्हणाल, कडक!!

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu arjun) ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa : The Rise)  हा सिनेमा नुसता धुमाकूळ घालतोय. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमानं 300 कोटींवर कमाई केली. सोशल मीडियावरही या सिनेमाची जोरदार चर्चा झाली. अगदी सिनेमांच्या गाण्यांपासून तर डायलॉगपर्यंत अनेक गोष्टी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यात. आता काय तर ‘पुष्पा: द राइज’चा मराठी ट्रेलर व्हायरल होतोय.होय, पुष्पाच्या या मराठी ट्रेलरने सर्वांनाच अक्षरश: वेड लावलं आहे. आता हा मराठी ट्रेलर कधी रिलीज झाला? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ही सगळी किएटीव्हिटीची कमाल आहे.होय, सोशल मीडियावर आपल्या भन्नाट क्रिएटीव्हिटीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘खास रे’ या युट्यूब चॅनेलवर ‘पुष्पा’चा मराठी ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.  

चित्रपटातील काही भाग हायलाईट्स करत त्यातील डायलॉगबाजी मराठी भाषेत डब केली आहे.  ‘जर तुमच्या हातात बंदुकी हायत तर आमच्या हातात बी कुऱ्हाडी हायत. वेळ आल्यावर गुच्चा बसणारच...असा एक डायलॉग या ट्रेलरमध्ये आहे आणि इथून ट्रेलरची सुरूवात होते आणि मग हा अख्खा ट्रेलर तुम्हाला खिळवून ठेवतो.  

व्हिडीओ काल म्हणजेच बुधवारी 19 जानेवारीला युट्यूब चॅनेलवर रिलीज करण्यात आला असून काही तासांमध्ये त्याला 24 हजारांच्या आसपास व्ह्यूज मिळाले आहेत. कमेंट्स तर विचारू नका. पूर्ण पिक्चर मराठीत बनवा, मस्त चालेल, असं एका युजरने लिहिलं आहे. आवडला आपल्याला, कडक, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत.

‘ पुष्पा: द राइज’  हा पुष्पा चित्रपटाचा पहिला भाग आहे. 2022 मध्ये या चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबतच फहाद फासिलने देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.

टॅग्स :अल्लू अर्जुनTollywoodरश्मिका मंदाना