Pushpa 2 Box Office Collection: तीन वर्षांपूर्वी आलेल्या 'पुष्पा: द राइज'चा ॲक्शन-पॅक सिक्वेल 'पुष्पा २: द रुल' ५ डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना व फहाद फासिल यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन दीड महिन्याहून अधिक काळ लोटला आहे, पण कमाईचा हा सिलसिला थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. भरगोस कमाई करणारा हा सिनेमा रोज जुने रेकॉर्ड मोडीत काढत आहे.
बॉक्स ऑफिसवर नवीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. पण, 'पुष्पाराज'ची भाईगिरी काही थांबेना. अजय देवगणचा 'आझाद' चित्रपट 'पुष्पा'पेक्षा मागे पडला. रवीना टंडनची मुलगी राशा थडानी आणि अजय देवगणचा पुतण्या अमन देवगणने या चित्रपटातून पदार्पण केले आहे. तर कंगनाचा 'इमर्जन्सी'देखील मागे पडला आहे. 'पुष्पा 2: द रुल'ने आतापर्यंत भारतात १,२३० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
'पुष्पा २: द रूल' हा देशातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. 'पुष्पा २'नं फक्त देशातच नाहीतर, परदेशातही आपला ठसा उमटवला आहे. सिनेमानं एकूण कमाईत १८०० कोटींचा आकडा पार केलाय. अजूनही चाहते हा सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करताना पाहायाला मिळत आहेत. सिनेमाची कथा एकदम ताजी आहे आणि रंजकपणे रचलेली आहे. ॲक्शन सीन्स अप्रतिम आहेत. त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांना आकर्षित करतोय.