Join us
Daily Top 2Weekly Top 5

'द स्काय इज पिंक'मधील प्रियंकाचा लूक झाला लीक, आईच्या भूमिकेत स्टायलिश अंदाजात दिसली देसी गर्ल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 11:20 IST

प्रियंका चोप्रा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रियंका 'द स्काय इज पिंक'मध्ये दिसणार आहे.

ठळक मुद्देयात प्रियंका जायरा वसीमच्या आईची भूमिका साकारणार आहे

प्रियंका चोप्रा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रियंका 'द स्काय इज पिंक'मध्ये दिसणार आहे. या सिनेमातून प्रियंका तीन वर्षानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय. यात ती जायरा वसीमच्या आईची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वीच 'द स्काई इज पिंक'चे शूटिंग संपल्यानंतर रॅपअप पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

आता या सिनेमाशी संबंधीत एका वेगळी माहिती समोर येतेय. सिनेमाचा फर्स्ट लूक आणि ट्रेलर रिलीज होण्यापूर्वीच पीसीचा सिनेमातला लूक लीक झाला आहे. प्रियंकाच्या फॅन क्लबच्या पेजवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे आणि या फोटोला कॅप्शन देखील दिले आहे. या फोटोमध्ये प्रियंका स्टायलिश अंदाजात सेमी-फॉर्मल ड्रेसमध्ये दिसतेय. 

'द स्काय इज पिंक' सिनेमा सत्य घटनेवर आधारीत आहे. या सिनेमाची कथा १३ वर्षीय आयशा चौधरीभोवती फिरते. या वयात तिला पल्मनरी फाइब्रोसिस हा आजार होतो. त्यानंतर ती मोटिवेशनल वक्ता बनते. त्यानंतर ती कधीच हार मानत नाही. वयाच्या १८व्या वर्षी तिचे निधन होते. या सिनेमात आयशाची भूमिका झायरा वसीमने साकारली आहे.

फरहान अख्तर व प्रियंका चोप्रा आयशाच्या आई- वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे शूटिंग मुंबई, लंडन व अंदमानमध्ये करण्यात आले आहे. प्रियंकाचे फॅन या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत असतील यात काही शंका नाही. 'द स्काय इज पिंक' सिनेमा ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस होणार आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्रा